अहमदनगर हायस्कूलमध्ये ‘माझी वसुंधरा’ अभियान विद्यार्थ्यांनी घेतली प्रतिज्ञा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, February 26, 2021

अहमदनगर हायस्कूलमध्ये ‘माझी वसुंधरा’ अभियान विद्यार्थ्यांनी घेतली प्रतिज्ञा

 अहमदनगर हायस्कूलमध्ये ‘माझी वसुंधरा’ अभियान विद्यार्थ्यांनी घेतली प्रतिज्ञा

प्रदुषण रोखण्यासाठी स्वत:पासून सुरुवात केली पाहिजे- प्राचार्य चौगुले


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः महानगरपालिका क्षेत्रात नागरिकांच्या सहभागातून ‘माझी वसुंधरा’ हे अभियान राबविण्यात येत आहे. यतीमखाना  संस्थेचे अहमदनगर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात  प्राचार्य चंद्रकांत चौगुले यांनी विद्यार्थ्यांकडून ‘माझी वसुंधरा’ अभियान अंतर्गत प्रतिज्ञा  म्हणून घेतली. यावेळी मेघा कुलकर्णी, समीना शेख, नाजीया शेख, मंगल अहिरे, पठाण आसमा शेख आफताब, यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी प्राचार्य चंद्रकांत चौगुले म्हणाले, सध्याच्या ग्लोबल वार्मिंगमुळे वातारणात दुषित झाले आहे. या दुषित वातावरणामुळे पाणी, हवा याद्वारे अनेक आजारांचा फैलाव होत असल्याने हवा-पाणी शुद्ध कसे राहिल यासाठी प्रयत्न केले पाहिजे. प्रदुषण रोखण्यासाठी स्वत:पासून सुरुवात केली पाहिजे. असे सांगून शासनाच्या आदेशाचे पालन करून  गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, हात साबणाने स्वच्छ धुवावे,  मास्क चा वापर नियमित करावा. सॅनिटायझरचा वापर करावा असे अवाहन करण्यात आले. विद्यालयात कोव्हिड- 19 च्या नियमांचे काटेकोर पालन करत पर्यावरण  व सध्याच्या वातावरणातील बद्दलच्या प्रतिज्ञेचे सार्वजनिक वाचन करण्यात आले.

No comments:

Post a Comment