राहुरी नगरपालिकेचे अंदाजपत्रक सर्वानुमते मंजूर - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, February 26, 2021

राहुरी नगरपालिकेचे अंदाजपत्रक सर्वानुमते मंजूर

 राहुरी नगरपालिकेचे अंदाजपत्रक सर्वानुमते मंजूर

राहुरी - राहुरी नगरपालिकेचे सन 2021/22या आर्थिक वर्षासाठीचे 32लाख 40हजार रुपयाचे शिलकी अंदाजपत्रक नगराध्यक्षा सौ अनिता दशरथ पोपळघट ह्यांचे अध्यक्षतेखाली मुख्याधिकारी डॉ श्रीनिवास कुरे ह्यांनी सादर केला.ते अंदाजपत्रक  सर्वानुमते मंजूर करण्यात आले.
राहुरी नगरपालिकेच्या वतीने नगराध्यक्षा सौ अनिता पोपळघट ह्यांनी सादर केलेल्या अंदाजपत्रकात नगरोत्थान अभियान (राज्यस्तर) नवीन सुधारित पाणी पुरवठा योजनेसाठी 28 कोटी,  अंतर्गत भूमिगत गटार योजनेसाठी 15कोटी रुपये, विशेष वैशिट्य पूर्ण योजनेसाठी 10कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली आहे. वैशिट्य पूर्ण कामासाठी 5कोटी रुपये स्थानिक विकास निधीसाठी 1कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली आहे.अंदाजपत्रकात तरतुदी करताना एकूण महसुली जमा 38कोटी 20लाख, एकूण भांडवली जमा 95कोटी 77लाख, एकूण महसुली खर्च 47कोटी 40लाख, एकूण भांडवली खर्च 120कोटी 69लाख, दाखवण्यात आला आहे.यावेळी उपनगराध्यक्ष सूर्यकांत भुजाडी,  अनिल कासार,  दिलीप चौधरी,  नंदकुमार तनपुरे,प्रकाश भुजाडी, विरोधी पक्ष नेते शिवाजी सोनवणे सोन्याबापू जगधने, शहाजी जाधव,सौ नंदाताई उंडे, सौ. संगीता आहेर,सौ सुमती सातभाई, सौ. राधा साळवे,श्रीमती मुक्ताताई करपे आदींनी चर्चेत सहभाग घेतला. अंदाजपत्रक लेखाधिकारी अर्जुन बर्गे ह्यांनी तयार केले त्यांना योगेश सर्जे व सर्व विभाग प्रमुख ह्यांनी सहकार्य केले.

No comments:

Post a Comment