बनावट खरेदीखताव्दारे कोट्यावधीची फसवणूक - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, February 8, 2021

बनावट खरेदीखताव्दारे कोट्यावधीची फसवणूक

 बनावट खरेदीखताव्दारे कोट्यावधीची फसवणूक


श्रीगोंदा -
बनावट दस्तावेज, खरेदीखत बनवून नगर येथील एका इसमाची श्रीगोंदा व नगर मधील काही लोकांकडून जमीन खरेदीत 1 कोटी 55 लाख रुपयांना फसवणूक झाल्याने श्रीगोंदा पोलीस ठाण्यामध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की दि. 10 जुलै 20 ते दि. 24 नोव्हेंबर 2020 रोजीपर्यंत सब रजिस्टर श्रीगोंदा व अहमदनगर येथे वेळोवेळी विशाल संपत वाघमारे रा.कोळगाव, रवि संजय ढवळे रा.काळकाई चोक, श्रीगोंदा, विश्वजीत रमेश कासार रा.वाळकी ता.अ.नगर, सुनिल फक्कड आडसरे रा.(पत्ता माहीत नाही), बनावट अनोळखी इसम (अर्पणा आनंद शेजबळ यांचे जागी उभी असलेली), बनावट इसम (आनंद केशव शेजवळ यांच जागी उभा असलेला) दोन्ही काळकाई चौक, श्रीगोंदा, इंद्रजित रमेश कासार रा.वाळकी ता.अ.नगर व कोमल विश्वजीत कासार रा.वाळकी ता.अ.नगर यांनी संगनमत करुन, फिर्यादी सूर्यकांत रावसाहेब कोल वय 45 वर्ष, धंदा व्यापार रा. आनंदविहार अपार्टमेंट स्टेशन रोड, मल्हार चोक, अहमदनगर यांचा विश्वास संपादन करुन, मुळ जमीन मालक आनंद केशव शेजवळ रा.पोफनवाडी कळबादेवी मुबंई यांची 9 हेक्टर 89 आर ही जमीन विक्रीस आहे.असे खोटे सांगुन, त्याचेजागी खरेदीखत मध्ये बनावट इसम आनंद केशव शेजवळ असल्याचे भासवुन प्रथम 9 हेक्टर 89 आर जमीनीची कागदपत्र बनवत स्वाक्षरी, खरेदीखत कागदपत्रात बदल करुन, 20 आर एवढी जमीनीचे खरेदीखत, त्यामध्ये बनवाट आधारकार्डची छायांकित प्रत बनवुन, कोल यांची रक्कम रुपये 1 कोटी 55 लाख 21 हजार 300 रुपयांची फसवणुक केली. याबाबत नमूद इसमांच्या विरुध्द सूर्यकांत रावसाहेब कोल यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन विशाल संपत वाघमारे, रवि संजय ढवळे, विश्वजीत रमेश कासार, सनिल फक्कड आडसरे, इंद्रजित रमेश कासार, कोमल विश्वजीत कासार यांच्यावर दिनांक 5 फेब्रुवारी 21 रोजी भा.द.वि.कलम 420, 419, 465, 467, 468, 471, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस नाईक मुकेशकुमार बडे यांनी हा गुन्हा दाखल केला असून, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित माळी हे या प्रकरणात पुढील तपास करीत आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here