खाजगी हॉस्पीटलांना जिल्हाधिकार्‍यांचे पाठबळ? - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, February 24, 2021

खाजगी हॉस्पीटलांना जिल्हाधिकार्‍यांचे पाठबळ?

 खाजगी हॉस्पीटलांना जिल्हाधिकार्‍यांचे पाठबळ?

कोरोना वाढणार?; खाजगी हॉस्पीटलवाले पुन्हा रुग्णांना लुटणार..

मनसेचा आरोप
 5 मार्चला आंदोलन


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः कोरोना रुग्णांकडून आकारलेली वाढीव बिले वसूल न करता जिल्हाधिकारी खाजगी रूग्णालयांच्या पाठीशी उभे आहेत. आता पुन्हा कोरोना डोके वर काढू लागलाय. पुन्हा खासगी रुग्णालये रुग्णांना लुटणार आहेत. जिल्हाधिकारी यांनी कोरोना आजारावर उपचार घेतलेल्या रुग्णांना वाढीव बिलांची रक्कम परत खाजगी हॉस्पिटल कडून परत मिळवुन दिली नसल्यामुळे मनसे 5 मार्च पासुन रोजी कोरोना आजारावर उपचार घेतलेल्या रुग्णांना वाढीव बिलांची रक्कम परत मिळण्याकरिता रस्त्यावर उतरणार असल्याचा ईशारा मनसेने नितीन भूतारे यांनी या पत्रकाद्वारे दिला आहे.

कोरोना आजारावर उपचार घेणार्‍या खाजगी हॉस्पीटल मधील वाढीव रक्कमेची बिलांची शासन नियमांप्रमाणे जिलधिकार्‍यांमार्फत त्यांच्या समिती मार्फत तपासणअंती अंती वसूल पात्र रक्कम खाजगी हॉस्पिटल वाले कोरोना रूग्णांना देत नसल्यामुळे मनसेच्या वतीने आंदोलने झाली शरद पवार साहेबांच्या दौर्‍यात मनसे या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी त्यांना फलक दाखविण्यात येणार होते परंतु जिल्हाधिकारी व मनसे तसेच पोलीस अधीक्षक यांच्या मध्ये बैठक होऊन एक महिन्याच्या आत खाजगी हॉस्पीटल मध्ये उपचार घेतलेल्या रुग्णांना त्यांच्या वाढीव बिलांची रक्कम आम्ही परत मिळवुन देऊ असा शब्द दिला होता. परंतु तो शब्द जिल्हाधिकारी यांनी पाळला नाही.
महानगर पालिकेच्या आरोग्य अधिकारी यांच्या प्रमाणेच उलट त्या लुटमार करणार्‍या खाजगी हॉस्पिटल च्या पाठीशी जिल्हाधिकारी उभे राहताना दिसत आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष महाविकास आघाडी सरकारचे मार्गदर्शक खासदार शरद पवार यांना देखील या संबंधी निवेदन दिले व त्यांनी सुध्दा या संबंधी आरोग्य मंत्री यांच्याशी चर्चा करुन हा प्रश्न निकाली काढू असे आश्वासन दिले होते. परंतु त्यांनी देखील दिलेला शब्द पाळला नाही. जिल्हाधिकारी यांच्या प्रमाणे अहमदनगर मधील गोरगरीब जनतेचा शरद पवारांनी विश्वास घात केला आहे. संपुर्ण महाराष्ट्रात खाजगी हॉस्पिटल मधील कोरोना रुग्णांची वाढीव बिलांची वसूल पात्र रक्कम त्या त्या रुग्णांना संपुर्ण महाराष्ट्रात परत मिळते. मग अहमदनगर जिल्ह्यातच हि वाढीव बिलांची रक्कम परत का मिळत नाही?हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा व जनतेचा आहे सवाल आहे. त्यातच पुन्हा कोरोना रुग्ण वाढत चालले असुन सरकारी यंत्रणा हि परिस्थिती हाताळण्यात सक्षम नसल्यामुळे पुन्हा सर्वसामान्य जनतेला खाजगी हॉस्पिटल लाखो रुपयांचे बिले भरावी लागणार आहेत.
या वेळी मनसेने जिल्हाध्यक्ष सचिन डफळ,शहराध्यक्ष गजेंद्र रशिंकर, जिल्हा उपाध्यक्ष मनोज राऊत महिला जिल्हाध्यक्ष अ‍ॅड अनिता दिगे, तसेच रस्ते आस्थापना चे जिल्हाध्यक्ष विनोद काकडे यांच्यासह सर्व मनसे उपशहराध्यक्ष व कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती मनसेने नितीन भुतारे यांनी दिली आहे.

No comments:

Post a Comment