मुलाचे अपहरण करणारा गजाआड - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, February 24, 2021

मुलाचे अपहरण करणारा गजाआड

 मुलाचे अपहरण करणारा गजाआड


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः 4 महिन्यांपासून एका मुलाचे अपहरण करणार्‍या दादा आसाराम घोडके रा. पारोडी ता. आष्टी जि. बीड यास अटक करून न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे.
सदर घटनेची हकीकत अशी की, आरोपी दादा आसाराम घोडके रा. पारोडी ता. आष्टी जि. बीड हा चार महिन्यांपासून त्याचे आईचे ताब्यातील त्याचा मुलगा नामे पृथ्वीराज या सोबत घेऊन फरार होता. आरोपी हा सतत आपला ठिकाणा बदलत असे व काढलेला फोटो फेसबुक वर दुसर्‍या दिवशी टाकून मोबाईल बदलत असे. अशाप्रकारे तो पोलिस यंत्रणेला एकाप्रकारे चॅलेंज करीत असे. मुलगा ताब्यात मिळण्यासाठी मुलाचे आईने न्यायालयात अर्ज दाखल केला होता त्या अर्जावरून न्यायालयाने सी.आर.पी.सी. 97 प्रमाणे सर्च वॉरंट काढून यातील बालकास सुखरूप न्यायालयासमक्ष हजर ठेवण्याबाबत पोलिसांना आदेश पारित केला होता. या आरोपीस पकडण्यासाठी मा.पोलीस अधीक्षक श्री. मनोज पाटील, मा.अप्पर पोलीस अधीक्षक श्री. सौरभ अग्रवाल, मा.उपविभागीय पोलिस अधिकारी नगर शहर विभाग अहमदनगर  श्री.विषाल ढुमे, सो. यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक श्री. एस.पी. गायकवाड यांनी आपले पोलीस स्टेशन मधील पोउपनिरी. समाधान सोळंके, सुरज मेढे, पोहेकॉ. डी.बी.जपे, पोना. ए.पी. इनामदार, राम सोनवणे, पोकॉ. शैलेश गोमसाळे अशा निवडक कर्मचार्‍यांची निवड करून अथक परिश्रमानंतर यातील बालक नामे पृथ्वीराज दादा घोडके या सुखरूप ताब्यात घेऊन मा. न्यायालयासमोर हजर करून गुन्ह्यातील आरोपी गजाआड केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here