आयुर्वेद ते दिल्लीगेटपर्यंत उड्डाणपुल करावा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, February 3, 2021

आयुर्वेद ते दिल्लीगेटपर्यंत उड्डाणपुल करावा

 आयुर्वेद ते दिल्लीगेटपर्यंत उड्डाणपुल करावा

शिवराष्ट्रसेना पक्षाच्यावतीने जिल्हाधिकार्‍यांना निवेदन


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः आयुर्वेद रस्ता ते दिल्लीगेट रस्ता हा छोट्या वाहनांने व मोठ्या वाहनांमुळे वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे. कल्याण रोड, मनमाड रोडवरुन येणारे वाहतुक याच रस्त्यावरुन जात असल्याने वाहतुकीची समस्या नियमित निर्माण होत असते. कल्याणरोड, काटवन, केडगांव परिसरातील असंख्य नागरिकांची ये-जा सुरु असते. तसेच रस्त्यावर अतिक्रमण करुन अनेकांनी आपली दुकाने, पाट्या, भाजी विक्रेते, फळांच्या गाड्या रस्त्यावरच असल्याने या रस्त्यावर वाहतुक कोंडी निर्माण होते. पर्यायाने रस्त्या लगतच्या गल्लीबोळातून ही वाहने जात असल्याने अनेक छोटे-मोठे अपघातही होत आहे. याच विचार करता या रस्त्यावर उड्डाणपुलाची आवश्यकता आहे, अशी मागणी शिव राष्ट्र सेना पक्षाच्यावतीने पक्षाध्यक्ष संतोष नवसुपे यांनी जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात केली आहे.
जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहर झपाट्याने वाढत आहे. अंत्यविधीसाठी अमरधाम हे महत्वाचे ठिकाण असल्याने बर्याचवेळेस येथील गर्दीचा मोठा त्रास संबंधितांना सहन करावा लागता. अनेकवेळी अंत्यसंस्कारासाठी येणार्यांना अडचणीचे ठरत असल्याने व या रस्त्यावरील वाहतुक सुरळीत होण्यासाठी आयुर्वेद रस्ता ते दिल्लीगेट पर्यंत उड्डाणपुल होणे गरजेचे आहे. यासाठी शासनाने लवकरात लवकर या पुलाचा आराखडा करुन त्वरित कार्यवाही करावी, अन्यथा आम्हाला या विरोधात उपोषण करावे लागेल, असेही निवेदनात म्हटले आहे. यावेळी शिवराष्ट्र सेनेचे जिल्हाध्यक्ष अक्षय कांबळे, दलितज महाघाडीचे अनिल शेकडकर, ओबीसी आघाडीचे बाबासाहेब करपे, युवा प्रमुख शंभु नवसुपे, युवा अध्यक्ष मुकुंद आंबेकर, देखरेख समितीचे समीर खडके, शेतकरी आघाडीचे भैरवनाथ खंडागळे, कामगार सेनेचे राधाकिसन कुलट, ओमकार जाधव आदि उपस्थित होते.

No comments:

Post a Comment