थ्रीडी रांगोळी प्रदर्शनास नगरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, February 3, 2021

थ्रीडी रांगोळी प्रदर्शनास नगरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

 थ्रीडी रांगोळी प्रदर्शनास नगरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

कलारंग ड्रॉईंग अ‍ॅकॅडमी आयोजित कार्यशाळेत


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः कलारंग ड्रॉईंग अ‍ॅकॅडमीच्या वतीने चित्रकार सुजाता औटी पायमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली तीन दिवसीय थ्रीडी रांगोळी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. सावेडीतील गुलमोहोर रोडवरील पारिजात कॉर्नर येथील कमलाबाई नवले हॉलमध्ये ही कार्यशाळा व प्रदर्शन संपन्न झाले. त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या कार्यशाळेत सहजयोगी सौम्या जाधव ही अवघ्या 10 वर्षांची सर्वांत लहान कलाकार असून, पहिल्याच प्रयत्नातून तिने श्री माताजी यांचे अतिवास्तववादी व्यक्तिचित्र रेखाटले. सुजाता औटी यांनी मार्गदर्शन केले असले, तरी श्री माताजी यांचे आशीर्वाद व ताकद यामुळे 5वीच्या या मुलीने 3 दिवस एकूण 30 तास शांत बसून असा चमत्कार करून दाखविला, तसेच याच कार्यशाळेत स्वतःच्या आजीचे अतिवास्तववादी व्यक्तिचित्र आर्या करडे या 12 वर्षांच्या लहान कलाकाराने रेखाटले आहे. तिची ही पहिलीच रांगोळी आहे. तिने एकूण 30 तास शांत बसून असा चमत्कार केला आहे.
या कार्यशाळेच्या माध्यमातून कलारंग ड्राईंग अ‍ॅकॅडमीच्या 16 विद्यार्थ्यांनी यांसारख्याच आणखीही अतिवास्तववादी व्यक्तिचित्र रांगोळीद्वारे रेखाटली आहेत. अगदी 10 वर्षांच्या मुलींपासून पुढील वयोगटातील मुलांनी या तीन दिवसीय कार्यशाळेत सहभाग घेतला. या सर्वांना चित्रकार व रांगोळीकार सुजाता औटी-पायमोडे यांनी मार्गदर्शन केले. या कलाकृतींचे प्रदर्शन नगरकर रसिकांना पाहण्यासाठी खुले होते. या प्रदर्शनात मोठ्या संख्येने नागरिकांनी भेट देऊन कलाकारांचा उत्साह वाढविला व त्यांचे कौतुक केले. यावेळी बेला अष्टेकर, सौंदर्या नांदूरकर, रेणुका सप्तर्षी, अथर्व नगरकर, सई दसरे, प्रथमेश साळवे, शाल्मली घाणेकर, रितेश देवडीकर, अपेक्षा संकलेचा, डॉ. शिल्पा राठोड, डॉ. नीलम पंडित, स्मिता गायकवाड, सौंदर्या जाधव, आर्या करंडे, अर्चना ताटी आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ज्यांना यपुढील काळात होणार्‍या रांगोळी कार्यशाळेत सहभागी घ्यावयाचा असेल, त्यांनी 9850177042 या मोबाईलवर संपर्क साधावा.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here