महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या अहमदनगर जिल्हा सचिवपदी दत्ता गाडगे यांची नियुक्ती - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, February 3, 2021

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या अहमदनगर जिल्हा सचिवपदी दत्ता गाडगे यांची नियुक्ती

 महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या अहमदनगर जिल्हा सचिवपदी दत्ता गाडगे यांची नियुक्ती


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
पारनेर ः महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या अहमदनगर जिल्हा सचिव पदी राज्य मराठी पत्रकारसंघाचे पारनेर तालुका अध्यक्ष दत्ता गाडगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.संघटनेचे प्रदेश अध्यक्ष वसंत मुंढे, राज्य संघटक संजय भोकरे व प्रदेश महासचिव विश्वासराव आरोटे यांच्या आदेशा नुसार जिल्हाध्यक्ष दत्ता पाचपुते यांनी दत्ता गाडगे यांची जिल्हासचिव पदी नियुक्ति केल्याचे पत्र दिले आहे.

दत्ता गाडगे हे पारनेर तालुक्यातील वडझिरे येथील रहीवासी असुन, त्यांनी पारनेर तालुका अध्यक्ष म्हणुन चांगले काम केले आहे.कोरोना काळामधे पारनेर तालुक्यात समाजामधे चांगले काम करणार्या समाजातील प्रत्येक घटकाला त्यांनी  कोरोना योध्दा  पुरस्कार देवुन सन्मानित केले होते. त्यामधे सामाजिक क्षेत्रामधुन शिवबा संघटना, राजकीय क्षेत्रामधुन तालुक्याचे आमदार निलेश लंके,अहमदनगर जि.प.चे माजी उपाध्यक्ष सुजित झावरेपाटील, पंचायत समिती सदस्य डॉ. श्रीकांत पठारे यांना, महसुल विभागामधुन पारनेरच्या तहसिलदार ज्योती देवरे यांना,गृह विभागा मधुन पारनेरचे पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांना, आरोग्य विभागामधुन डॉ.आकाश सोमवंशी, सुपा कोव्हीड सेंटरच्या आरोग्य सेविका सोनाली गुंड, शिक्षण विभागामधुन शिक्षक आनंदा झरेकर यांना, कान्हुरचे ग्रामपंचायत कर्मचारी शशिकांत साळवे यांना कोरोना योध्दा पुरस्काराने सन्मानित केले.
पत्रकार बंधुंना सोबत घेवुन तालुक्यामधे विविध ठिकाणी वृक्षारोपण मोहीम राबविली. दत्ता गाडगे यांचे संघटन कौशल्य वाखानन्याजोगे असुन, अल्पावधीमधे त्यांनी पारनेर तालुक्यात चांगली मोठी संघटना उभी केली आहे. राज्यामधे तालुका स्तरावर संघटनेची सर्वात मोठी जम्बो कार्यकारीणी गाडगे यांनी उभी केली. तालुक्यातील पत्रकारांच्या प्रत्येक प्रश्नासाठी त्यांनी प्रामाणिक प्रयत्न करत पत्रकारांचे पाठीशी खंबिरपणे उभे राहुन त्यांना मदत केली.त्यांचे उत्कृष्ट संघटना बांधनीचे कौशल्य, विविध कार्यक्रमांचे आयोजन करुन ते यशस्वी करुन दाखविण्याचे काम दत्ता गाडगे यांनी केले. या कामाची दखल घेत दैनिक नगरी दवंडीचे संपादक राम नळकांडे यांनी त्यांचा नगरी दवंडीच्या वर्धापन दिनानिमीत्त कोरोनायोध्दा म्हणुन सन्मान केला. या सर्व कार्याची दखल घेत त्यांच्या कामाच्या अनुभवाचा जिल्हातील संघटनेला फायदा होईल या उद्देशानेच दत्ता गाडगे यांची निवड केल्याचे जिल्हाध्यक्ष दत्ता पाचपुते यांनी सांगीतले. जिल्हा सचिवपदी निवड झाल्या नंतर झालेल्या प्रदेश महासचिव विश्वासराव आरोटे यांनी दत्ता गाडगे यांचा शाल श्रीफळ देवुन सत्कार केला. या प्रसंगी बोलताना विश्वासराव आरोटे म्हणाले, दत्ता गाडगे यांचे संघटनेमधील भवितव्य उज्वल राहील. तसेच संघटना बांधणी कामी त्यांच्या अनुभवाचा निश्चितच उपयोग होईल असे सांगीतले. यावेळी प्रतिक्रिया देताना दत्ता गाडगे यांनी, समाजातील सर्व घटकांना बरोबर घेवुन,संघटना बांधणीसाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगीतले.दत्ता गाडगे यांच्या निवडीबद्दल नगर दक्षिणचे खासदार सुजय विखेपाटील, पारनेरचे आमदार निलेश लंके, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे, प्रदेश संघटक संजय भोकरे, प्रदेश महासचिव विश्वासराव आरोटे, जिल्हाध्यक्ष दत्ता पाचपुते, दैनिक राष्ट्र सह्याद्रीचे संपादक करण नवले,दैनिक नगरी दवंडीचे संपादक राम नळकांडे, आपला आवाज न्युज चॅनलचे मुख्य संपादक अतुल परदेशी, विघ्नहर टाईम्सचे संपादक सुरेश वाणी, न्युज टुडे 24 चे संपादक मन्सुर भाई शेख, आदिंनी त्यांच्या निवडी बद्दल स्वागत व अभिनंदन केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here