अजनुज ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी प्रगती गिरमकर, उपसरपंच विशाल कवडे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, February 12, 2021

अजनुज ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी प्रगती गिरमकर, उपसरपंच विशाल कवडे

 अजनुज ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी प्रगती गिरमकर, उपसरपंच विशाल कवडेनगरी दवंडी/प्रिंतनिधी
श्रीगोंदा ः श्रीगोंदा तालुका राजकीय दृष्टीने महत्वपूर्ण समजाणार्या व निर्णायक ठरणार्या अजनुज ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी सौ प्रगती योगेश गिरमकर व उपसरपंच पदी विशाल दत्ताञय कवडे यांची निवड झाली.
तालुक्यातील राजकिय दृष्ट्या महत्त्वाच्या असणार्‍या अजनुज ग्रामपंचायतीच्या सरपंच उपसरपंच निवडीत सरपंचपदासाठी काळे पुजा योगेश, गिरमकर गिता अशोक, गिरमकर पल्लवी हनुमंत, गिरमकर प्रगती योगेश या चार उमेदवारांनी अर्ज भरले होते निवडप्रक्रियेत प्रगती योगेश गिरमकर यांना 7 मते मिळाली, तर गिरमकर गिता अशोक यांना 6 मते मिळाली या चुरशीच्या लढती मध्ये गिरमकर प्रगती योगेश या 1 मतांनी विजयी होऊन सरपंच पदी विराजमान झाल्या तर उपसरपंच पदासाठी अपक्ष म्हणुन निवडून आलेले कवडे विशाल दत्ताञय आणि शितोळे नानासाहेब रामदास यांनी अर्ज भरले होते यामध्ये कवडे विशाल दत्ताञय यांना 7 मते, तर शितोळे नानासाहेब रामदास 6 मते मिळवुन या चुरशीच्या लढतीत कवडे विशाल दत्ताञय हे 1 मतांनी विजयी झाले. या निवडी साठी निवडणुक आधिकारी म्हनुन हिवळकर डी.एल यांनी तर सह्यायक निवडणुक आधिकारी ग्रामसेवक गोळे भाऊसाहेब यांनी काम पाहिले. या निवडीनंतर जिल्हा परिषदेचे माजी सभापती बाळासाहेब गिरमकर, माजी चेअरमन राजेंद्र गिरमकर, श्रीपाद ख्रिस्ती, रामदास गिरमकर, योगेश गिरमकर, सतिश गिरमकर, नवनियुक्त ग्रामपंचायत सदस्य कविता गिरमकर, मंदाबाई गिरमकर, रामदास जालिंदर गिरमकर, चिराजी चव्हाण यांनी सत्कार केला, या सरपंच निवडीनंतर खासदार सुजय दादा विखे पाटील, माजी आमदार राहुल जगताप, नागवडे कारखान्याचे चेअरमन राजेंद्र दादा नागवडे यांनी शुभेच्छा दिल्या.

No comments:

Post a Comment