संजय चोरडिया यांची सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल सत्कार - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, February 12, 2021

संजय चोरडिया यांची सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल सत्कार

 संजय चोरडिया यांची सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल सत्कार


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः संजय चोरडिया आणि पोलिस विरोधाभास एक जैन व्यक्ती आणि पोलीस मध्ये नक्कीच आश्चर्य वाटण्यासारखे आहे. हे खर आहे त्यांच्या मनमिळावू आणि सहकार्य करण्याच्या वृत्तीमुळे ते परिसरात लोकप्रिय आहेत. संजू भैया गेल्या 31 वर्षापासून पोलीस सेवेमध्ये कार्यरत आहे. नांगरे साहेब, कृष्णप्रकाश साहेब तसेच ज्योतिप्रिया सिंग मॅडम यांच्यासोबत बर्‍याच कारवायांमध्ये मध्ये संजू भैय्याचा सहभाग होता.
गोविंदपुरा येथील रहिवासी श्री संजू भैया उर्फ संजय मांगीलाल चोरडिया यांची दि. 4 फेब्रुवारी 2021 रोजी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल गोविंदपुरा येथील रहिवाशांकडून त्यांचा सत्कार करण्यात आला.व भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. या वेळी शांकीर शेख, मोहसीन खान, प्रा.प्रकाश सोनार, विशाल घोडके, बेबी आपा, कावेरी सोनार,  करुणा मनिकजडे, लक्ष्मी मिसाळ, कांचन मैड इ. रहिवासी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment