मुंबई आर्ट मॅरेथॉन चित्रप्रदर्शनात नगरच्या कलाकारांचे कौतुक - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, February 3, 2021

मुंबई आर्ट मॅरेथॉन चित्रप्रदर्शनात नगरच्या कलाकारांचे कौतुक

 मुंबई आर्ट मॅरेथॉन चित्रप्रदर्शनात नगरच्या कलाकारांचे कौतुक


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः दिल्ली येथील कलाआकार फाऊंडेशन आयोजित मुंबई आर्ट मॅरेथॉन 2021 अंतर्गत बॉम्बे आर्ट सोसायटी या ठिकाणी भरविण्यात आलेल्या प्रदर्शनात  अहमदनगर मधील कलाकारांचे चित्रे झळकली. कलाआकार फाऊंडेशनच्या संचालिका श्रीमती जया अरोरा मॅडम यांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन करून प्रदर्शनाची सुरुवात झाली. दोन दिवसीय प्रदर्शनातील कलाकृतींना उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. या चित्र प्रदर्शनात  अहमदनगरच्या  ‘आकार आर्टिस्ट ग्रुप’ चे आडेप दत्तात्रेय, वल्लाल बालाजी, थोरात भाऊसाहेब, आरे मुकुंद, शिंदे अनुपम, सौ.थिगळे प्राची, बेंद्रे पांडुरंग, पुरी विठ्ठल, कुंटला हरीश, वैभव मोहरे, अशोक वागस्कर, प्रवीण नेटके व  नेटके ड्रॉइंग अकॅडमी मधील विद्यार्थी चित्रकार सहभागी झाले होते.या चित्रप्रदर्शनात नगरमधील चित्रकांरांनी काढलेल्या चित्रांची उपस्थित मान्यवरांनी व येणार्‍या चित्रप्रेमींनी विशेष कौतुक केले.श्रीमती जया अरोरा यांनी नगरमधील चित्रकारांसाठी नेहमीच प्रोत्साहन देऊन त्यांचे चित्रे विविध शहरातील चित्र प्रदर्शनासाठी निवड करुन सहभागी केली आहेत. याबद्दल नगरचे चित्रकार बालाजी वल्लाल यांनी त्यांचे आभार मानले.

No comments:

Post a Comment