ना.बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त काँग्रेसच्या वतीने मोफत शिवभोजन थाळी उपक्रम - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, February 3, 2021

ना.बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त काँग्रेसच्या वतीने मोफत शिवभोजन थाळी उपक्रम

 ना.बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त काँग्रेसच्या वतीने मोफत शिवभोजन थाळी उपक्रम


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः काँग्रेस प्रदेशाध्यक्ष महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने मोफत शिवभोजन थाळीचा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाचा शुभारंभ काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या शुभहस्ते रेल्वे स्टेशन समोरील श्री दत्त हॉटेल शिवभोजन थाळी केंद्र या ठिकाणी झाला.
यावेळी ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष मनोज गुंदेचा, केंद्राचे संचालक दत्ताशेठ गायकवाड, शहर जिल्हा उपाध्यक्ष खलिल सय्यद, निजामभाई जहागीरदार,  अनंतराव गारदे, आयिंदी शहा, अल्पसंख्याक विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष अज्जूभाई शेख, अनिसभाई चुडीवाल, क्रीडा काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्रवीणभैय्या गीते पाटील,सेवादल काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष डॉ.मनोज लोंढे, शहर जिल्हा सचिव प्रशांत वाघ, सहसचिव नीता बर्वे, खजिनदार मोहनराव वाखुरे यांची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना किरण काळे म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारने सत्तेवर आल्यानंतर राज्यातील गोरगरीब जनतेसाठी शिवभोजन थाळी योजना सुरू केली. योजना सुरु झाल्यापासून आजपर्यंत राज्यातील लाखो सर्वसामान्य लोकांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. नगर शहरामध्ये देखील ही योजना चांगल्या पद्धतीने राबवली जात आहे.शासनाची ही योजना कौतुकास्पद आहे. ना.बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त नगर शहरातील श्री दत्त हॉटेल शिवभोजन केंद्रावरील येणार्‍या सर्वसामान्य नागरिकांना एक दिवसासाठी मोफत भोजन दिले जात आहे.

No comments:

Post a Comment