महानगरपालिकेच्या गरजू व्यक्तींना धनादेशांचे वाटप ः वाकळे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, February 19, 2021

महानगरपालिकेच्या गरजू व्यक्तींना धनादेशांचे वाटप ः वाकळे

 महानगरपालिकेच्या गरजू व्यक्तींना धनादेशांचे वाटप ः वाकळे


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः महानगरपालिकेच्या वतीने महापौर वैद्यकिय सहाय्यता निधी महानगरपालिका हद्दीतील  गरिब  गरजू व  निराधार व्यक्तींना हदय शस्त्रक्रिया , कॅन्सर, मेंदूवरील शस्त्रक्रिया, मुत्रपिंड इत्यादी आजारावरील शस्त्रक्रियेसाठी व उपचारासाठी तसेच इतर आजारासाठी आर्थिक मदत संबंधीत रूग्णास धनादेशद्वारे दिली जाते.  मा.महापौर श्री.बाबासाहेब वाकळे यांनी आत्तापर्यत जास्तीत जास्त रूग्णांना मदत केलेली आहे.  
या कार्यक्रमाच्या वेळी स्वाती खरात या रूग्णाला मा.महापौर श्री.बाबासाहेब वाकळे यांचे शुभहस्ते धनादेश देण्यात आला. यावेळी नगरसेवक मा.श्री.रविंद्र बारस्कर, मा.श्री.आप्पासाहेब नळाकंडे, मा.श्री.मयूर ताठे , श्री.काळे,  श्री.किशोर कानडे, श्री.राजेश लयचेट्टी, श्री.सोनू चौधरी, श्री.शशिकांत देवकर आदी उपस्थित होते.  
यावेळी मा.महापौर श्री.बाबासाहेब वाकळे म्हणाले की, या आर्थिक वर्षामध्ये कोवीडच्या महामारी मुळे महानगरपालिकेस निधी अभावी अशा कामांना निधी उपलब्ध झाला नाही. दरवर्षी गरीब व गरजू रूग्णांसाठी उपचाराकरिता स्वतंत्र निधीची तरतूद करण्यात येते व यामधून बरेच रूग्णांना मदतही दिली जाते. परंतु यावर्षी आर्थिक परिस्थितीमुळे रूग्णांना मदत करण्यात विलंब झाला. आता यासाठी निधी उपलब्ध करून रूग्णांना मदत करण्यात आलेली आहे. त्यामुळे गरिब रूग्णांना उपचारासाठी दिलासा मिळाला आहे. शस्त्रक्रिया किंवा उपचाराकरिता मोठया प्रमाणात खर्च येत असल्याने रूग्णांना आर्थिक मदतीची गरज असते मनपाच्या माध्यमातून या साठी ही मदत केली जाते.  
सदरील मदतीमुळे अनेक रूग्ण आजारातून बरे झालेले आहेत. सन 2020- 2021 या आर्थिक वर्षामध्ये  1) शितल चंद्रकांत देठे 2) धनुष योगेश सिद्दम 3) पद्मवती दिनकर सकट 4) विश्वास रमेश सरोदे 5) राजश्री मल्लिकार्जुन कल्याणम 6) जिशान शेख  7) गायत्री जनार्धन मडू 8) गिरीष जामगावकर 9) ओवी निरंजन जाधव 10) लता मोहनलाल गांधी 11) दुर्वा अमित जाडकर  12) संतोष दिलीप पाटील 13) अशोक बापूराव पाटील 14) शिंदे संतोष देवयन 15) गणेश रामचंद्र राऊत 16) श्रीनिवास राजेंद्र जिद्दम 17) लावण्या मोहन म्याना 18) स्वाती गौतम खरात 19) राजेश विठोबा बिल्ला 20) रक्षणता संजय पाडळे या रूग्णांना रक्कम रूपये  1 लाख 80 हजार ची आर्थिक मदत करण्यात आलेली आहे.

No comments:

Post a Comment