केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी घेतली मेढे कुटुंबियांची भेट - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, February 19, 2021

केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी घेतली मेढे कुटुंबियांची भेट

 केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी घेतली मेढे कुटुंबियांची भेट


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः ज्येष्ठ पत्रकार दीपक मेढे यांचे वडील आदर्श शिक्षक व मुख्याध्यापक कालकथित रामचंद्र सटवाजी मेढे यांचे वयाच्या 90 व्या वर्षी वृद्धापकाळाने दु:खद निधन झाले होते.  
निधनाची वार्ता समजताच केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री खासदार रामदास आठवले यांनी तातडीने मेढे कुटुंबियांची भेट घेवून त्यांचे सांत्वन केले.
यावेळी माध्यमांशी बोलताना मंत्री आठवले म्हणाले कि, मेढे कुटुंबीयांचे फुले शाहू आंबेडकर चळवळीत मोठे योगदान आहे.
कालकथित रामचंद्र सटवाजी मेढे गुरुजी यांनी आयुष्यभर दुर्बल व वंचित समूहातील विद्यार्थ्यांना घडविण्याचे कार्य केले. त्यांचे शैक्षणिक कार्याची दखल घेऊन शासनाने त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरव केला होता. त्यांनी त्यांच्या मुला मुलींनाही उत्तम संस्कार देवून उच्च शिक्षित केले. आज त्यांचे मुले विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत आहेत. विशेष करून दीपक मेढे यांनी आंबेडकरी चळवळीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान देत आहेत. मेढे गुरुजींची सून संध्या मेढे या महिलांच्या प्रश्नांवर कार्य करीत असून चळवळीचा वारसा जपत आहेत असे त्यांनी आवर्जून सांगितले.
मेढे गुरुजींच्या जाण्याने फुले शाहू आंबेडकर चळवळीची मोठी हानी झाली आहे असे म्हणत त्यांनी गुरुजींना श्रद्धांजली वाहिली. यावेळी त्यांच्या सोबत आरपीआयचे राष्ट्रीय उपाध्यक्ष काकासाहेब खंबाळकर, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे, शहराध्यक्ष किरण दाभाडे, प्रवीण मोरे, विलास साठे, रेहमत सुलतान फाऊंडेशनचे युनुसभाई तांबटकर, नादिर खान, आरिफ सय्यद, डॉ.गोरे, प्रा. सॅम्युअल वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here