टाटा मेमोरियलमधील रेडिओथेरपी तज्ज्ञ डॉ. शेजूळ गरूड कॅन्सर हॉस्पिटलमध्ये उपलब्ध - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, February 19, 2021

टाटा मेमोरियलमधील रेडिओथेरपी तज्ज्ञ डॉ. शेजूळ गरूड कॅन्सर हॉस्पिटलमध्ये उपलब्ध

 टाटा मेमोरियलमधील रेडिओथेरपी तज्ज्ञ डॉ. शेजूळ गरूड कॅन्सर हॉस्पिटलमध्ये उपलब्ध


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः साडेतीन दशकांपासून कॅन्सर रूग्णांवर प्रभावी उपचार करणार्या नगरमधील डॉ.गरूड कॅन्सर हॉस्पिटल आणि अहमदनगर कॅन्सर सेंटरमध्ये टाटा मेमोरियल हॉस्पिटल मुंबई येथील अनुभवी कॅन्सर रेडिओथेरपी तज्ज्ञ डॉ.जगदीश शेजूळ हे पूर्णवेळ रूजू झाले आहेत. त्यांनी टाटा मेमोरियलमध्ये 4 वर्षे सेवा केली आहे. अत्याधुनिक रेडिएशन थेरपीत डॉ.शेजूळ यांचा हातखंडा असून त्यांच्या अनुभवाचा लाभ आता रूग्णांना मिळणार आहे, अशी माहिती कॅन्सरतज्ज्ञ डॉ.प्रकाश गरूड यांनी दिली.
रेडिओथेरपी, थ्रीडी सीआरटी, आयएमआरटी, आयजीआरटी, एसआरएस, एसबीआरटी, व्हीमॅट, रॅपिड आर्क या उपचार पध्दतीला कॅन्सर उपचारांत महत्त्व आहे. यात डॉ.शेजूळ हे तज्ज्ञ असून अनेक रूग्णांना त्यांच्या अनुभवाचा लाभ झाला आहे. आता डॉ.गरूड कॅन्सर हॉस्पिटलमधील रूग्णांना त्यांच्या या सेवेचा लाभ होणार आहे. गरुड हॉस्पिटल ऍण्ड अहमदनगर कॅन्सर सेंटर येथे सर्व प्रकारच्या कॅन्सर शस्त्रक्रिया, कॅन्सर केमोथेरपी, रेडियोथेरपी, मॅमोग्राफी तपासणी उपलब्ध आहेत. केंद्र शासनाची प्रधानमंत्री जीवन आरोग्य विमा योजनेंर्तत रेडिओथेरपीसह कॅन्सरचे सर्व उपचार मोफत उपलब्ध आहेत. महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत रेडिओथेरपी लाईटसह कॅन्सर शस्त्रक्रिया, केमोथेरपी हे सर्व उपचार मोफत केले जातात. याशिवाय कर्मचार्यांसाठी ईएसआयएस योजनेंतर्गतही उपचारांची सुविधा याठिकाणी आहे. आंतरराष्ट्रीय अमेरिकन तंत्रज्ञानाचे रेडिओथेरपी मशिन सेवाही येथे उपलब्ध झाली आहे. आता गरूड हॉस्पिटलमध्ये टाटा मेमोरियल हॉस्पिटलचे रेडिओ थेरपी तज्ज्ञ डॉ.जगदीश शेजूळ पूर्णवेळ उपलब्ध असून या सेवांचा रूग्णांनी लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here