संकटकाळात निधी उपलब्ध करणे हेच नगरसेवकांचे कौशल्य : निखिल वारे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, February 26, 2021

संकटकाळात निधी उपलब्ध करणे हेच नगरसेवकांचे कौशल्य : निखिल वारे

 संकटकाळात निधी उपलब्ध करणे हेच नगरसेवकांचे कौशल्य : निखिल वारे

प्रभाग 2 मधील बंद गटार पाईप कामाचा शुभारंभ


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः कोरोना संकटाच्या काळामध्ये संपूर्ण राज्यासह आपल्या महापालिकेवर आर्थिक संकट ओढवले असतानाही प्रभाग 2 च्या नगरसेविका रुपाली वारे, संध्या पवार, नगरसेवक विनित पाऊलबुद्धे, सुनील त्रिंबके व बाळासाहेब पवार यांनी प्रभागाच्या विकासासाठी महापालिका व आ. संग्राम जगताप यांच्या माध्यमातून मोठा निधी उपलब्ध करुन दिला आहे. आता ही कामे प्रभागामध्ये लवकरच सुरु होणार आहे. संकट काळात नगरसेवकांनी निधी उपलब्ध करण्यासाठी त्यांनी कसोशिने पाठपुरावा केल्याने हा निधी उपलब्ध झाला आहे, त्यामुळे या नगरसेवकांचे कौशल्य दिसून येते. शहर विकासाचे बाळगलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रत्येक नगरसेवकांनी आपआपल्या प्रभागातील मुलभूत प्रश्नापासून ते विकासाचे प्रश्न मार्गी लागल्यास शहर विकासाला चालना मिळते. यासाठी प्रत्येक नगरसेवकाने समस्यामुक्त प्रभाग करावे. प्रभाग क्र. 2 मधील आम्ही सर्व नगरसेवक प्रभागाच्या सर्वांगिण विकासासाठी कटिबद्ध आहोत. प्रभाग विकासाचे नियोजन करणे गरजेचे असल्यामुळे विकासा कामाचा आराखडा तयार केला आहे. जेणेकरून एक काम पुन्हा पुन्हा करण्याची गरज पडणार नाही. पुढील 40 वर्षांच्या विकासकामांचे नियोजन केले आहे. त्यानुसार जमिनी अंतर्गत बंदपाईप गटार योजना, पिण्याच्या पाण्याच्या योजनेचे काम हाती घेतले असून, प्रभाग 2 मधील जमिनी अंतर्गत सर्व कामे मार्गी लागणार आहेत. त्यानंतर रस्त्याची कामे, सुशोभिकरणाची कामे हाती घेतली आहे. या विकासकामांमध्ये नागरिकांचा सहभाग असणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन माजी नगरसेवक निखिल वारे यांनी केले.
प्रभाग क्र. 2 मध्ये वीरसावरकर मार्ग, स्टेट बॅक कॉलनी येथे बंदपाईप गटार कामाचा शुभारंभ मा.नगरसेवक निखिल वारे यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी माजी नगरसेवक विनित पाऊलबुद्धे, सुनील त्रिंबके, बाळासाहेब पवार, रत्नाकर बडे, आर. डी. कस्तुरे, आर. एम. बल्लाळ, मिलिंद कोलते, मधुसुदन कोलते, निलकंठ मोडक, चंद्रकांत पेंडसे, तुषार बोरा, दत्तात्रय सरोदे, सुधाकर आव्हाड, अशोक केसकर, भारतकुमार भालसिंग, शिवाजी तांबे, हितेश चौधरी आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment