योग्यवेळी तपासणी व उपचारांनी कॅन्सरवर मात करणे शक्य : डॉ. प्रकाश गरूड - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, February 26, 2021

योग्यवेळी तपासणी व उपचारांनी कॅन्सरवर मात करणे शक्य : डॉ. प्रकाश गरूड

 योग्यवेळी तपासणी व उपचारांनी कॅन्सरवर मात करणे शक्य : डॉ. प्रकाश गरूड


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः कॅन्सर हा दुर्धर आजार असला तरी नवनवीनन संशोधनामुळे त्यावरही मात करणे शक्य झाले आहे. यासाठी वेळीच तपासणी, अचूक निदान होणे आवश्यक आहे. योग्य उपचारांनी कॅन्सर पूर्ण बरा होवू शकतो. यासाठी शंका वाटल्यास न घाबरता तज्ज्ञांकडून तपासणी करून घेतली पाहिजे. तसेच कॅन्सर प्रतिबंधासाठी जीवनशैलीत आवश्यक बदल केले पाहिजे, असे प्रतिपादन कॅन्सर तज्ज्ञ डॉ.प्रकाश गरुड यांनी केले.
सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील घोगाव येथील श्री शिक्षण संस्था संचलित श्री संतकृपा कॉलेज ऑफ फार्मसी या महाविद्यालयात नुकतेच परिसरातील जनतेसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित केले होते. कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी रोटरी इंटरनॅशनलचे डिस्ट्रिक्ट डायरेक्टर आणि गरुड कॅन्सर हॉस्पिटलचे सर्वेसर्वा डॉ प्रकाश गरुड, हॉस्पिटलचे सीईओ अभय राजे, प्राचार्य विजयानंद अरलेलीमठ, डॉ शेखर कोगनुळकर, डॉ संगीता पाटील, रोटरी क्लब ऑफ कराडचे अध्यक्ष गजानन माने, उपाध्यक्ष राजेश खराटे, रघुनाथ डुबल, यांची उपस्थिती होती. हे शिबिर श्री संतकृपा कॉलेज ऑफ फार्मसी, ओन्कोलाइफ कॅन्सर सेंटर, सातारा, तसेच रोटरी क्लब ऑफ कराड व ग्रामीण रुग्णालय उंडाळे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते. या शिबिरामध्ये कर्करोग या आजाराची चाचणी करण्यात आली.

No comments:

Post a Comment