मेढे गुरुजींचे सामाजिक कार्य दखल घेण्यासारखे- ना. रामदास आठवले - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, February 20, 2021

मेढे गुरुजींचे सामाजिक कार्य दखल घेण्यासारखे- ना. रामदास आठवले

 मेढे गुरुजींचे सामाजिक कार्य दखल घेण्यासारखे-  ना. रामदास आठवले


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ःश्री मेढे गुरूजी यांचे निधन झाल्यानंतर केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री ना. रामदास आठवले हे ज्येष्ठ पत्रकार दिपक मेढे व समाजसेविका संध्याताई मेढे यांच्या निवासस्थ 
नगर प्रतिनिधी आदर्श शिक्षक सेवानिवृत्त मुख्याध्यापक रा.स.मेढे गुरुजी यांच्या सामाजिक कार्याची आंबेडकर चळवळीत दखल घेतली जाईल असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री ना. रामदास आठवले यांनी केले.

श्री मेढे गुरूजी यांचे शुक्रवारी अहमदनगर येथे वृध्दापकाळाने वयाच्या 90 व्या वर्षी निधन झाले.त्यावेळी ना.आठवले हे ज्येष्ठ पत्रकार दिपक मेढे व समाजसेविका संध्याताई मेढे यांच्या निवासस्थानी सांत्वन पर भेटीत बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाजसेवक युनूस भाई तांबटकर होते. याप्रसंगी बोलताना ना.आठवले पुढे म्हणाले, दीपक हा पत्रकारितेत काम करत असतानाही भारतीय दलित पँथर चळवळीत सामाजिक भूमिकेतून कायम आजही माझ्यासोबत सक्रिय पणे काम करत आहे त्यांच्या वडिलांच्या निधनाचे वृत्त कळताच मी तातडीने अहमदनगर येथे येण्याचा निर्णय घेतला.

सेवानिवृत्त उपअभियंता व्हि आर मेढे, सारडा  कॉलेजचे माजी प्राचार्य सहदेव मेढे, सौ विमल ताई भालेराव, श्रीमती संघमित्रा साळवे यांचे ते वडील होते. याप्रसंगी रिपाईचे राष्ट्रीय उपाध्यक्ष काकासाहेब खंबाळकर, रिपाई महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्रीकांत भालेराव, सामाजिक कार्यकर्ते आरीफभाई शेख,रूग्णमित्र नादिर खान, प्रा.सॅम्युअल वाघमारे,आशाताई हरेल,रिपाईचे दक्षिण सुनिल साळवे, शहर जिल्हाध्यक्ष किरण दाभाडे, रिपाई उत्तर जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात,विलास साठे व मराठा आघाडी रिपाईचे जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ शिसोदे आदी मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment