संस्कृती श्रीनिवास कनोरे प्रशालेत छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, February 20, 2021

संस्कृती श्रीनिवास कनोरे प्रशालेत छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन

 संस्कृती श्रीनिवास कनोरे प्रशालेत छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन

नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ःकल्याण रोड, ड्रीम सिटीमागील श्री लक्ष्मीनारायण शिशु शिक्षण मंदिर संचलित संस्कृती श्रीनिवास कनोरे प्रशालेत शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी मुकुल गंधे, शाळेचे चेअरमन जितेंद्र लांडगे, सचिव अविनाश पावले, संस्थेचे सचिव गजेंद्र सोनवणे,  विश्वस्त संजय सागांवकर, गणेश अष्टेकर, बाबासाहेब वैद्य, प्रदीप ओहळ, श्री.दळवी, मुख्याध्यापिका कल्पना भामरे आदि उपस्थित होते.

   याप्रसंगी जितेंद्र लांडगे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार व कार्य आजही आपल्याला प्रेरणा व  ऊर्जा निर्माण करते म्हणून  अशा कर्तुत्ववान व पराक्रमी राजांविषयी व्यक्त होताना शब्दही कमी पडतात. असे व्यक्तीमत्व सर्वांची नेहमीच प्रेरणा राहिली आहे. यावेळी मुकुल गंधे, गणेश अष्टेकर आदिंनी आपले विचार व्यक्त केले.मुख्याध्यापिका कल्पना भामरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जीवनपट सांगून शाळेच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. शेवटी अविनाश पावले यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here