भक्ती, शक्ती, युक्ति, संस्कार म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज- कुलकर्णी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, February 20, 2021

भक्ती, शक्ती, युक्ति, संस्कार म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज- कुलकर्णी

 भक्ती, शक्ती, युक्ति, संस्कार म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज- कुलकर्णी 

सावेडीतील श्री समर्थ विद्या मंदिर प्रशालेत श्री.छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात संपन्न

नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ःशिवरायांच्या अंगी भक्ती, शक्ती, युक्ति आणि संस्कार हे गुण होते. त्यांच्या या गुणामुळेच ते आपल्या जीवनात यशस्वी झाले.युध्दावर जाताना ते नेहमी भवानी माता आणि आपली आई जिजामाता यांचे दशन घेउनच ते बाहेर पडत.ही भक्ती शत्रुशी लढताना शक्ती व युक्तीचा वापर योग्य वेळी ते करत आणि परकी स्त्री आपल्यासमोर आली असता तिला साडी चोळी देउन पाठवणी केली हे त्यांचे संस्कार हे सर्व गुण आपण अंगीकारून त्याप्रमाणे आचार विचार ठेवावेत भक्ती, शक्ती, युक्ति आणि संस्कार म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज होय, असे प्रतिपादन  समर्थ विद्या प्रसारक मंडळाचे व्हा.चेअरमन डी. आर. कुलकर्णी यांनी केले.

   सावेडीतील श्री समर्थ विद्या मंदिर प्रशालेत श्री.छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजाच्या मुर्तीस समर्थ विद्या प्रसारक मंडळाचे व्हा.चेअरमन डी. आर. कुलकर्णी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समर्थ विद्या प्रसारक मंडळाचे व्हा.चेअरमन डी. आर. कुलकर्णी हे होते. शालेय समितीचे चेअरमन सुरेश क्षीरसागर,प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक दुर्योधन कासार,माध्यमिक विभागाच्या पर्यवेक्षिका सौ.सोनटक्के आदी मान्यवर उपस्थित होते.

सुरेश क्षीरसागर म्हणाले शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्र भारत देश यापुरते मर्यादीत नसुन ते जगातील अनेक देशाचे आदश असल्याचे सांगितले याचे उदाहरण देताना त्यांनी व्हिएतनाम व अमेरिका युध्दात व्हीएतनाम सारख्या छोटया देशाने अमेरिकेसारख्या बलाढय देशाचा पराभव केला.याप्रसंगी व्हिएतनामच्या अध्यक्षांना पत्रकारांनी विचारले की, तुम्ही हे कसे शक्य करून दाखवले तेव्हा ते म्हणाले आमचा आदश भारतातील छत्रपती शिवाजी महाराज आहेत त्यांच्या गनिमी काव्यामुळे आम्ही हे शक्य करून दाखवले.

मुख्याध्यापक दुर्योधन कासार यांनी आपल्या प्रास्ताविकात छत्रपती शिवाजी महाराजांपासून आपण प्रेरणा घेऊन आपल्या जीवनाची वाटचाल करावी.नुसते शिवरायांचे चरित्र वाचून, महाराजांचा जयजयकार करून किंवा भगवा हातात घेऊन नाचण्यापेक्षा शिवरायांच्या आचाराविचाराप्रमाणे आपण वागावे असे सांगितले.शिवरायांच्या जयंतीनिमित्त वर्गणी मागणार्‍यांना शिवरायांच्या आचारविचार ध्येयाविषयी काहीही माहिती नसते.म्हणून प्रथम शिवरायांना समजुन घ्या आणि त्याप्रमाणे वागा. शिक्षक गणेश पारधे व अमोल बागुल यांनीही मनोगत व्यक्त केले.विदयार्थी चि. साईराज सरडे याने आपल्या सुरेल आवाजात पोवाडयातून शिवराय अफजलखान भेट वणन केली.तर कु.सई शिनगारे हीने आपल्या भाषणातून शिवरायांच्या जीवनातील काही प्रसंग साक्षात नजरेसमोर उभे केले. यावेळी प्राथमिक व माध्यमिक उच्च माध्यमिक विभागाचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.साईराज सरडे,अणर्व पवळ,सर्वेश मुटकुळे,समथ पांडव,साई सांगळे, कु. सई शिनगारे या विदयार्थ्यानी शिवाजी व मावळे यांची वेशभुषा करून कार्यक्रमाची शोभा वाढवली. रघुनाथ चांदेकर यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले.भगवान जाधव यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment