थोरातांच्या वाढदिवसानिमित्त काँग्रेस बळकटीकरण सप्ताहाचे आयोजन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, February 6, 2021

थोरातांच्या वाढदिवसानिमित्त काँग्रेस बळकटीकरण सप्ताहाचे आयोजन

 थोरातांच्या वाढदिवसानिमित्त काँग्रेस बळकटीकरण सप्ताहाचे आयोजन


नगरी दवंडी/प्रतिनिधी

जामखेड ः महसूलमंत्री बाळासाहेब थोरात साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त काँग्रेस बळकटीकरण सप्ताह आयोजीत युवक काँग्रेस ने चलो अभिनयाचा शुभारंभ मा.आ.डॉ.सुधिरजी तांबे साहेब यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी युवक काँग्रेसच्या शाखेचे उद्घाटन केले.
    यावेळी जिल्हा काँग्रेसचे समन्वयक ज्ञानदेव वाफारे, जिल्हा सरचिटणीस माणिकराव मोरे, युवक काँग्रेस चे कार्यकारी जिल्हा अध्यक्ष राहुल उगले, शहर काँग्रेस चे अध्यक्ष देवीदास भादलकर, जिल्हा सचिव सुनील शिंदे, अल्पसंख्याक काँग्रेस अध्यक्ष फिरोज पठाण, युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष शिवराजे घुमरे,चेअरमन अंकुश कोल्हे,जमीर सय्यद,तालुका उपाध्यक्ष कुंडल राळेभात,विद्यार्थी काँग्रेस तालुका अध्यक्ष बळिराम पवार, अनिकेत जाधव,अनिल अडाले, उमेश माळवदकर तसेच पत्रकार बंधू आदी उपस्थित होते. यावेळी शहर काँग्रेस उपाध्यक्ष पदी अस्लम आतार,युवक काँग्रेस च्या शहर कार्याध्यक्ष पदी शुभम बनकर, विध्यार्थी काँग्रेस च्या तालुका कार्याध्यक्ष पदी तैकीर पठाण,शहर अध्यक्ष पदी प्रतीक भाकरे,तालुका उपाध्यक्ष प्रणव सोनवणे, शहर उपाध्यक्ष पदी जय ढाले, सरचिटणीस पदी प्रशांत सूर्यवंशी आदीच्या नियुक्ती केल्या. तसेच वार्ड 6 च्या अध्यक्ष पदी उत्कर्ष खैरे उपाध्यक्ष अविराज डुचे,वार्ड 11 च्या अध्यक्ष पदी अनिकेत राऊत,उपाध्यक्ष पदी अथर्व राजगुरू सचिव तन्मय सुरोडे,वार्ड 20 च्या अध्यक्ष लखन कोल्हे,उपाध्यक्ष महादेव कोल्हे,सचिव धीरज ( बालू ) निमोणकर आदीच्या नियुक्त्या केल्या तसेच पत्रकार नासीर पठाण, अशोक निमोकर, अशोक वीर, समीर शेख, पप्पुभाई सय्यद, अजय अवसरे आदी पत्रकार बांधव उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here