वीज बिलांची सक्तीची वसुली थांबवावी ः आ. पाचपुते - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, February 6, 2021

वीज बिलांची सक्तीची वसुली थांबवावी ः आ. पाचपुते

 वीज बिलांची सक्तीची वसुली थांबवावी ः आ. पाचपुते


नगरी दवंडी/प्रतिनिधी

श्रीगोंदा ः राज्य सरकारने शेतकर्‍यांकडून सक्तीची वसुली करण्याऐवजी वीज मंडळाला 1हजार कोटीची तरतूद करावी व शेतकरी वाचवावा असे प्रतिपादन आमदार बबनराव पाचपुते यांनी वीज वितरण च्या विरोधातील आंदोलनाच्या वेळी बोलताना केले.
    महावितरणने महाराष्ट्रातील 75 लाख वीज ग्राहकांना कनेक्शन तोडण्याची नोटीस पाठवलेली आहे यामध्ये श्रीगोंदा तालुक्यातील अनेकांना विजतोडीची नोटीस व तोंडी माहिती देण्यात आलेली असून विजतोडीचे काम महावितरणने चालू केले आहे. वास्तवामध्ये महावितरण कडून अनेकांना अव्वाच्या-सव्वा बिले कोरोना काळामध्ये आलेली आहेत, अनेकांची बिले तर लाखोंच्या घरात आलेली आहेत तसेच तालुक्यात घोड विसापूर व कुकडीचे आवर्तन चालू आहे. अशा वेळी शेतकर्‍यांचे वीज कनेक्शन तोडल्यास शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होणार आहे. हा सावळा गोंधळ असताना 75 लाख वीज ग्राहकांना कनेक्शन तोडण्याची नोटीस पाठवून महाराष्ट्रातील 4 कोटी जनतेला अंधारात टाकण्याचे पाप करणा-या महावितरणच्या बोगस कारभारा निषेधार्थ शुक्रवार दि. 5 फेब्रुवारी, 2021 रोजी सकाळी 11.00 वाजता श्रीगोंदा येथे भाजपाच्या वतीने महावितरण कार्यालयावर ॠॠहल्लाबोल व ठिय्याॠॠ आंदोलन करण्यात आले.
   यावेळी बोलतांना आमदार बबनराव पाचपुते यांनी आघाडी सरकारचा तीव्र शब्दात निषेध केला राज्य सरकार ने शेतकर्‍याचा गळा घोटण्याच काम केले आहे वीज कनेक्शन तोडण्याऐवजी सरकारने वीज मंडळाला एक हजार कोटीची तरतूद करावी व शेतकरी वाचवावा कोरोनाच्या काळात शेतकर्‍यांना कोणत्याच पिकांना भाव मिळाला नाही तरीसुद्धा वारेमाप बिल आकारणी करणे चुकीचे आहे असे पाचपुते म्हणाले.
      यावेळी भाजपा श्रीगोंदा तालुका अध्यक्ष संदीप नागवडे, बाळासाहेब महाडिक, उपनगराध्यक्ष रमेश लाढाणे  नगरसेवक  संतोष खेतमाळीस, बापूसाहेब गोरे, अशोक खेंडके, संग्राम घोडके  शहाजी खेतमाळीस नितीन नलगे ,माजी सभापती शहाजी हिरवे,पोपट खेतमाळीस   दीपक शिंदे  राजेंद्र उकांडे, जयश्री कोथिंबिरे दीपक हिरनावळे महेश क्षीरसागर  ,आदी उपस्थित होते. यावेळी वीजवितरण चे अधिकारी चौगुले यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here