नेवासा फाटा येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, February 5, 2021

नेवासा फाटा येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर

 नेवासा फाटा येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर


नगरी दवंडी/प्रतिनिधी
नेवासा ः नेवासा फाटा येथील स्पर्श हॉस्पिटलच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त रविवार दि.7 फेब्रुवारी रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले असून या शिबिराचा परिसरातील सर्व गोरगरीब रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन डॉ.पूजा व शिवतेज दारुंटे यांनी केले आहे.
नेवासा फाटा येथे नेवासा रोडवर असलेल्या स्पर्श हॉस्पिटलला एक वर्ष पूर्ण होत आले आहे. या हॉस्पिटलच्या वर्धापनदिनानिमित्त एक सामाजिक बांधिलकी म्हणून परिसरातील गोरगरीब रुग्णांसाठी हे मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले असून या शिबिरात सर्व रुग्णांची निःशुल्क तपासणी केली जाणार आहे.
या शिबिरात सहभागी होणा-या गोरगरीब रुग्णांसाठी सवलतीच्या दरात शस्त्रक्रियेची संधीही स्पर्श हॉस्पिटलच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आली असून या सुवर्णसंधीचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन डॉ.शिवतेज दारुंटे यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment