महाराष्ट्र साहित्य परिषद सावेडी शाखेच्या वारसा दिवाळी अंकास पहिला राज्यस्तरीय पुरस्कार - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, February 19, 2021

महाराष्ट्र साहित्य परिषद सावेडी शाखेच्या वारसा दिवाळी अंकास पहिला राज्यस्तरीय पुरस्कार

 महाराष्ट्र साहित्य परिषद सावेडी शाखेच्या वारसा दिवाळी अंकास पहिला राज्यस्तरीय पुरस्कार

अहमदनगर ः यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, पिंपरी चिंचवड या प्रतिष्ठित संस्थेचा या वर्षीच्या दिवाळी अंक स्पर्धेसाठीचा पहिला राज्यस्तरीय पुरस्कार महाराष्ट्र साहित्य परिषद,सावेडी उपनगर,अहमदनगर शाखेच्या वारसा दिवाळी अंकास देण्यात आला.
पुरस्कार वितरण काल गुरुवारी राळेगण सिद्धी थोर समाजसेवक पद्मभूषण श्री अण्णा हजारे यांच्या शुभहस्ते व नारायण सुर्वे साहित्यकला अकादमीचे अध्यक्ष सर्वश्री सुदाम भोरे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले, नामवंत कवी भरत दोंडकर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत शानदार समारंभात संपन्न झाला. म सा प सावेडी उपनगर शाखेचे प्रमुख कार्यवाह व अंकाचे कार्यकारी संपादक जयंत येलुलकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला. वारसा दिवाळी अंकासाठी शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल फाऊंडेशनचे मोलाचे योगदान यामुळेच हा अंक साहित्य रसिकांपुढे आला असून शाखेचे अध्यक्ष, संपादक सन्माननीय श्री नरेंद्र फिरोदिया यांचे मार्गदर्शन, पदाधिकारी, सहसंपादक प्रा.श्री शशिकांत शिंदे, लेखक, कवी यांचा मोलाचा सहभाग यामुळेच अंकाची दर्जेदार निर्मिती होऊ शकली. असे येलुलकर यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here