कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता,प्रत्येक नागरीकांनी स्वतःची काळजी घेणे गरजेचे ! आ.निलेश लंके - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, February 22, 2021

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता,प्रत्येक नागरीकांनी स्वतःची काळजी घेणे गरजेचे ! आ.निलेश लंके

 कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता,प्रत्येक नागरीकांनी स्वतःची काळजी घेणे गरजेचे ! -  आ.निलेश लंके

हंगा येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न !


पारनेर :
आरोग्य सेवा आपल्या दारी या उपक्रमांतर्गत कॅरीयर, मायआयडीया कंपनी व स्नेहालय संस्थेच्या वतीने हंगा येथे मोफत सर्व रोग तपासणी शिबीर, पार पडले.शिबीरा साठी आमदार निलेश लंके यांनी प्रयत्न केले तसेच हंगा येथील नागरीकांना या मोफत शिबीराचा लाभ घेण्याचे आवाहन केले . समुदाय अरोग्यवर्धीनी उपक्रमांतर्गत आरोग्य तपासणी मध्ये बी.पी, शुगर, आम्लापित्त,पोटाचे विकार,संधीवात  यावर मोफत औपधोषचार करनाऱ्या शबीराचे उद्घाटन हंगा गावचे सरपंच श्री. बाळासाहेब दळवी यांचे हस्ते करण्यात आले.सदर शिबीरात २५० नागरीकांनी सहभाग नोंदवत तपासणी करून औषोद्योपच्चार घेतला . सदर शिबीरास उत्स्फूर्त सहभाग नोंदवला गेला .
       हंगा ग्रामपंचायतीने आयोजीत केलेल्या या शिबीरास उपस्थित असनाऱ्या  सर्व डॉक्टर्स व त्यांच्या सर्व टीमचे उपसरपंच सौ.वनिता शिंदे यांनी आभार मानले .
        यावेळी जगाधिश साठे, राजेंद्र दळवी, रूपाली दळवी, सविता नगरे, मेघा नगरे ,सुलोचना लोंढे, राजेंद्र शिंदे, निता रासकर ,माया साळवे यांच्या सह दिपक लंके, चंद्रकांत मोढवे, सुहास नगरे , बाळासाहेब शिदे, सोपान दळवी, अशोक नगरे, रमेश ठोंबरे यांच्यासह शिबीराचा लाभ घेण्यासाठी आलेले हंगा ग्रामस्थ , निलेश लंके प्रतिष्ठान व राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक पदाधीकारी हितचितक व सहकारी मित्र यावेळी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment