जैन कॉन्फरन्स व कोठारी प्रतिष्ठानच्या वतीने शिवजयंती साजरी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, February 20, 2021

जैन कॉन्फरन्स व कोठारी प्रतिष्ठानच्या वतीने शिवजयंती साजरी

 जैन कॉन्फरन्स व कोठारी प्रतिष्ठानच्या वतीने शिवजयंती साजरीनगरी दवंडी

जामखेड -जैन कॉन्फरन्स व कोठारी प्रतिष्ठान हे सर्वसामान्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात तेही कुठल्याही अपेक्षा शिवाय काम करत असतात आज समाजात अशी माणसे बोटावर मोजता येतील इतकी आहे असे प्रतिपादन नगर परिषद चे मुख्याधिकारी मीनीनाथ दंडवते यांनी केले 

        आज १९ फेब्रुवारी शिवजयंती  जैन कॉन्फरन्स चतुर्थ झोन व कोठारी प्रतिष्ठान मार्फत साजरी करण्यात आली यावेळी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते ,गटविकास अधिकारी परशुराम कोकणी  ,वैद्यकीय अधीक्षक संजय वाघ, तालुका आरोग्य अधिकारी  सुनील बोराडे ,मुकुंद सातपुते तसेच सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी अमोल लोहकरे,  अमर डोंगरे, सुमित घायतडक दी उपस्थित होते 

. यावेळी बोलताना मिनीनाथ दंडवते म्हणाले मी सात आठ महिन्यापूर्वी आलो त्या दिवशी पासून सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांचे काम जवळून पाहिले आहे ते नेहमी सामाजिक कार्यात सर्वात पुढे असतात त्यामुळे त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमास हजर राहावे असे वाटते

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here