समाजासाठी रोटरी क्लब जास्तीतजास्त चांगल्या सुविधा देत आहे : कोटबागी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, February 10, 2021

समाजासाठी रोटरी क्लब जास्तीतजास्त चांगल्या सुविधा देत आहे : कोटबागी

 समाजासाठी रोटरी क्लब जास्तीतजास्त चांगल्या सुविधा देत आहे : कोटबागी

रोटरी डायलिसिस सेंटरचे लोकार्पण

नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः मनुष्य जर सुधृढ असेलतर त्याचे आचार विचारही सुधृढ होतात. जागतिक स्तरावर रोटरी क्लब समाज सुधृढ होण्यासाठी जास्तीतजास्त चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न करत आहे. नगरच्या मिडटाऊन क्लबने सुरु केलेले डायलेसीस सेंटर गरजू रुगांना खूप उपयोगी ठरणार आहे. सध्या आयपत असलेले सधनांमध्येही मोफत उपचार घेण्याची मानसिकता वाढत आहे. यासाठी रोटरीच्या सदस्यांनी खर्‍या गरजूंनाच याठिकाणी डायलेसीसची उपचार सेवा मिळाले याकडे लक्ष द्यावे. सर्वसामान्यांना उपयोगी पडेल अशा सुविधा देतांना आम्हाला खूप आनंद होत आहे. मात्र खर्‍या गरजूंना या सुविधा मिळाल्यातर जास्त समाधान होईल. रोटरी इंटरनॅशनल कायमच चांगल्या प्रोजेक्टला भरभरून मदत करत आहे. म्हणून समाजातील प्रत्तेक गरजूसाठी उपक्रम राबवा रोटरी इंटरनॅशनल खंबीरपणे मागे उभे आहे, असे प्रतिपादन रोटरी इंटरनॅशनलचे डायरेक्टर डॉ. महेश कोटबागी यांनी केले.
येथील सामाजिक कार्यात अग्रेसर असणार्‍या रोटरी क्लब ऑफ अहमदनगर मिडटाऊनच्या प्रयत्नाने व ग्लोबल ग्रँटच्या सहकार्यातून मॅककेअर हॉस्पिटल मध्ये सुरु करण्यात आलेल्या अत्याधुनिक मशिनरी युक्त रोटरी डायलिसिस सेंटरचे लोकार्पण रोटरी इंटरनॅशनलचे डायरेक्टर डॉ. महेश कोटबागी यांच्या हस्ते समारंभपूर्वक करण्यात आले. यावेळी प्रांतपाल हरीश मोटवानी, माजी प्रांतपाल प्रमोद पारीख, सुहास वैद्य, ओम मोतीपवळे, रुक्मेश जकोटीया, रोटरी क्लब मिडटाऊनचे अध्यक्ष क्षितिज झावरे, सचिव दिगंबर रोकडे, प्रोजेक्ट चेअरमन विजय इंगळे, डॉ.आनंद काशीद, डॉ. प्रशांत पटारे, डॉ. सतीश सोनवणे आणि मॅककेअर हॉस्पिटल मधील सर्व डॉक्टर्स आदींसह रोटरी क्लबचे सदस्य उपस्थित होते. नगर शहरातील आणि जिल्ह्यातील अनेक गरजू रुग्णांना विनामूल्य किंवा अत्यल्प दरात डायलिसिस उपचाराची सुविधा मॅककेअर हॉस्पिटलमध्ये मिळणार आहे.

No comments:

Post a Comment