पोलिस प्रशासनाने महिलांच्या सुरक्षिततेची हमी घ्यावी : नगरसेवक स्वप्निल शिंदे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, February 10, 2021

पोलिस प्रशासनाने महिलांच्या सुरक्षिततेची हमी घ्यावी : नगरसेवक स्वप्निल शिंदे

 पोलिस प्रशासनाने महिलांच्या सुरक्षिततेची हमी घ्यावी : नगरसेवक स्वप्निल शिंदे

सावेडी परिसरात चेनस्नॅकरांचा पुन्हा सुळसुळाट, एकाच दिवशी चार घटना


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः शहरासह सावेडी उपनगरामध्ये भरदिवसा चेनस्नॅकरांनी महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र भर गर्दीत तसेच रहदारीच्या ठिकाणी ओढून नेण्याचे धाडस चोरांमध्ये निर्माण झाले आहे. त्यांच्यावर पोलिसांचा कुठलाही धाक वा कुठलाही वचक नसल्यामुळे चेनस्नॅकींगचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातवरण पसरले आहे तर महिलांना फिरणेही अवघड झाले आहे. यावर पोलिस प्रशासनाने गंभीर दखल घेऊन महिलांना तसेच नागरिकांना सुरक्षिततेची हमी द्यावी, अशी मागणी मा. सभागृह नेते तथा नगरसेवक स्वप्निल शिंदे, अमित गटणे व नागरिकांनी तोफखाना पोलिस स्टेशनमध्ये जाऊन पी. आय. सुनील गायकवाड यांच्या निवेदनाद्वारे मागणी केली.काल (दि.8) रोजी एकाच दिवशी सायंकाळी 5 वा. कोहिनूर मंगल कार्यालय परिसरामधून तोंड बांधलेले दोन चोर काळ्या रंगाची शाईन या दुचाकीवर महिलांना काकू काकू म्हणत आवाज दिला व गळ्यातील मंगळसूत्र तोडून फरार झाले. त्यानंतर लगेच 5.40 वा. प्रोफेसर कॉलनी चौकातील निर्मल डेअरी समोर रहदारी व गर्दीच्या ठिकाणी याच पद्धतीने आवाज देत गळ्यातील गंठण तोडून प्रेमदान चौकाकडे पसार झाले. त्यानंतर 5.50 वा. आम्रपाली मंगल
कार्यालया जवळून महिलेच्या गळ्यातील साखळी तोडून लंपास झाले. तसेच सकाळी बालिकाश्रम रोडवरही महिलाच्या गळ्यातील सोनसाखळी चोरून नेण्याचा प्रकार घडला. या एकामागे एक असे चार घटना घडल्याने सावेडी परिसरातील महिलांमध्ये दहशत पसरली आहे.यावेळी पोलिस निरीक्षक गायकवाड यांनी नगरसेवक स्वप्निल शिंदे व शिष्टमंडळास यांनी सांगितले की, आरोपींना लवकरच अटक होईल, परंतु मुद्देमाल हस्तगत व्हायला वेळ लागतो. नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी ठिकठिकाणी दक्ष नागरिक सुरक्षित नागरिक, अशा सूचनांच्या फलक लावण्यात येत आहे. तरी महिलांनी आपल्या गळ्यातील दागिन्यांची काळजी घ्यावी. रस्त्यावर शक्यतो एकटे जाणे टाळावे, असे ते म्हणाले.

No comments:

Post a Comment