कलाकारांना प्रोत्साहित करण्याचे भाजपा सक्षमपणे करेल - भैय्या गंधे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, February 10, 2021

कलाकारांना प्रोत्साहित करण्याचे भाजपा सक्षमपणे करेल - भैय्या गंधे

 कलाकारांना प्रोत्साहित करण्याचे भाजपा सक्षमपणे करेल - भैय्या गंधे

महाराष्ट्र भाजपा सांस्कृतिक प्रकोष्ठ शिवगान स्पर्धा उत्साहात संपन्न


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः यंदाच्या शिवजयंती निमित्त महाराष्ट्र स्तरावर भाजपा सांस्कृतिक प्रकोष्ठच्या वतीने भव्य शिवगान स्पर्धा 2021  चे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेची प्राथमिक फेरी जिल्हास्तरावर अहमदनगर येथे आद्य नाट्याचार्य भरतमुनी यांच्या जयंतीचे निमित्त साधून दि. 9 फेब्रुवारी रोजी , खंडेलवाल भवन, जॉगिंग ट्रॅक जवळ सावेडी, अहमदनगर या ठिकाणी संपन्न झाली. तर अंतिम फेरी शिवजयंती दिनी 19 फेब्रु. रोजी अजिंक्यतारा गड सातारा येथे संपन्न होणार आहे.
नगर येथे झालेल्या स्पर्धा केवळ शिवरायांवरील स्तुती गीतांची असून त्यात पोवाडा, पाळणा, आरती, स्फुतीगीते, अभंग, ओवी, ललकारी आदी प्रकारचे गीत सादर करण्यात आले. स्पर्धेचा शुभारंभ प्रमुख पाहुण्यांचा हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. या स्पर्धेत अहमदनगर जिल्ह्यातील अधिकाधिक गायक कलावंतांनी सहभागी झाले होते. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून डॉक्टर विवेक दसरे तसेच सौ सुनीता प्रथमशेट्टी यांनी काम पाहिले.
या याप्रसंगी बोलताना सुप्रसिद्ध सिने-नाट्य अभिनेते मोहिनीराज गटणे यांनी अंतिम फेरीसाठी विजेत्याना शुभेच्छा दिल्या, तसेच भाजपा जिल्हाध्यक्ष श्री भैय्या गंधे  यांनी आगामी काळात भाजपा सांस्कृतिक प्रकोष्ठ च्या वतीने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून विविध कलाकारांना प्रोत्साहित करण्याचे काम भारतीय जनता पार्टी सक्षम पणे करेल अशी ग्वाही दिली. त्यांना उपस्थित सर्व कलावंतांना ज्येष्ठ रंगकर्मी पी डी कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी तुझं माझं जमतंय फेम अभिनेत्री अवंती होशिंग आणि अभिनेता राहुल सुराणा देखील उपस्थित होते.या स्पर्धेत वैयक्तिक गट मध्ये प्रथम क्रमांक शर्वरी मुळे यांना सात हजार रोख , दिव्तीय क्रमांक आदेश चव्हाण यांना पाच हजार रोख, तृतीय क्रमांक सायली बोकील यांना तीन हजार रोख,उत्तेजनार्थ प्रथम गिरीराज जाधव, दिव्तीय नरेंद्र साळवे. समूह गट प्रथम क्रमांक स्वरोह्म संगीत विद्यालय यांना 11,000 रोख. दिव्तीय राहुरी रॉकर्स राहुरी यांना 7500 रोख. तृतीय भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूल यांना 5100 रोख, उत्तेजनार्थ प्रथम ओंकार संगीत निकेतन, द्वितीय करंदीकर कलामंच यांनी मिळवले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाजप सांस्कृतिक प्रकोष्ठ नगर महानगर कार्यकारणी सदस्य शिवानी मनवेलिकर यांनी केले. नाट्यशास्त्र प्रणेते आद्य भरतमुनी यांच्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी सांस्कृतिक प्रकोष्ठ, महाराष्ट्र प्रदेश यांच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात आज दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी एकाच दिवशी सर्व जिल्ह्यांमध्ये ही स्पर्धा संपन्न झाली असे सांस्कृतिक प्रकोष्ठ उत्तर महाराष्ट्र सहसंयोजक विवेक जोशी यांनी सांगितले,  जिल्हा स्पर्धा संयोजक अमित गटणे यांनी प्रास्ताविक केले तर सांस्कृतिक प्रकोष्ठ उत्तर महाराष्ट्र कार्यकारणी सदस्य सौरभ कुलकर्णी यांनी आभार मानले.भाजपा सांस्कृतिक प्रकोष्ठ तर्फे पराग पाठक, प्रदीप वाळके, विद्या जोशी, ऋषिकेश देशमुख सुरज कुरलीये यांनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here