नगर तालुक्यातील क्रशर चालकांना लाईट बिलानुसार रॉयल्टी आकारणी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, February 8, 2021

नगर तालुक्यातील क्रशर चालकांना लाईट बिलानुसार रॉयल्टी आकारणी

 नगर तालुक्यातील क्रशर चालकांना लाईट बिलानुसार रॉयल्टी आकारणी

71  खाणींना 165 कोटी रुपयांच्या नोटिसा, क्रशरधारकांनी पुकारला बेमुदत बंद  

औदयोगिक कामावर होणार परिणाम -दंड वीज बिलानुसार आकारले जाणार असतील तर क्रशर धारकांना व्यवसाय बंद ठेवण्याचा निर्णय घ्यावा लागेल व याचा औदयोगिक व प्रशासकीय कामावर परिणाम होईल असा असा इशारा खानमालकांनी महसूल प्रशासनाला दिला आहे.


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः नगर तालुका महसूल प्रशासनाने सर्व क्रशर व खाणपट्टा धारकांना त्यांनी वापरलेल्या विदयुत युनिट नुसार रॉयल्टीची आकारणी सुरु केली आहे. यानुसार 71 क्रशर चालकांना 165 कोटी रुपयांच्या वसुलीसाठी नोटिसा आल्या आहेत. या अवाजवी रॉयल्टीच्या निषेधार्थ खडी  क्रशर बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय चालकांनी घेतला आहे
तालुक्यातील कापूरवाडी, पोखर्डी, खंडाळा, चास, घोसपुरी, सारोळा कासार, निंबोर्डी, देहरे, मांडवा, राळेगण म्हसोबा, वारूळवाडी, आगडगाव या गावांमध्ये 71खडी क्रशर आहेत. नाशिक विभागीय आयुक्तांच्या नव्या आदेशानुसार प्रती ब्रास तेरा युनिट प्रमाणे दंड आकरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.दंड हा युनिट नुसार आकारला असून प्रत्यक्ष क्रशर मशीनद्वारे खडी तयार करताना चार प्रकारे क्रशिंग केल्यानंतर खडी, क्रश सॅन्ड, हे प्रॉडक्ट तयार होतात. त्यामुळे एक ब्रास डबर हे चार ठिकाणी क्रश केले जाते. यासाठी प्रती ब्रास जास्त वीज लागते.तसेच लाईटचा वापर हा क्रशरवरील बोअरवेल, कॉम्प्रेसर मशीन, मजुरांच्या वस्तीवरील लाईट, क्रशर मेंटेनसाठी असलेले वेल्डिंग मशीन आदी बाबींसाठी एकाच मिटर चा वापर केला जातो. प्रत्यक्षात चार प्रकारच्या प्रोसेस होत असल्याने हा दंड चुकीच्या पद्धतीने आकारण्यात आल्याचे खाण चालकांचे म्हणणे आहे.या नोटीसां संदर्भात क्रशर चालकांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, अतिरिक्त जिल्हाधिकारी पी. एम. सोरमारे यांना निवेदन दिले आहे.जो पर्यंत नोटिसा मागे घेतल्या जात नाहीत तोपर्यंत क्रशर सुरु करणार नाही अशी  भूमिका क्रशर चालकांनी घेतली असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष अशोक भगत, उपाध्यक्ष संपत लोटके, सचिव प्रभाकर घोडके,प्रवीण कार्ले, सुरेश वारुळे, सुभाष आढाव, महादेव भगत,विशाल उजागरे, मिनीनाथ दुसुंगे,अजय कराळे, बाळासाहेब पठारे,आदिनाथ बेरड यांनी दिली.

No comments:

Post a Comment