साई एक्सप्रेसला राहुरी व श्रीगोंदा रेल्वे स्थानकांवर थांबा द्यावा : जोशी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, February 26, 2021

साई एक्सप्रेसला राहुरी व श्रीगोंदा रेल्वे स्थानकांवर थांबा द्यावा : जोशी

 साई एक्सप्रेसला राहुरी व श्रीगोंदा रेल्वे स्थानकांवर थांबा द्यावा : जोशी


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः सर्वसामन्य नागरिकांना मुंबईला जाण्यासाठी खिश्याला परवडेल अश्या साई एक्सप्रेस येत्या 11 मार्च पासून सुरु होणार आहे. मात्र राहुरी व श्रीगोंदा रेल्वे स्टेशनवर या गाडीला थांबा दिला नसल्याने या तालुक्यातून थेट मुंबईला जाण्यासाठी प्रवासी वंचित राहणार आहे. त्यामुळे साई एक्सप्रेसला राहुरी व श्रीगोंदा या रेल्वे स्थानकावर थांबा देवून प्रवासी व उद्दोजाकांची सोय करावी अशी मागणी रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य व हिंद सेवा मंडळाचे मानद सचिव संजय जोशी यांनी निवेदनाद्वारे केली आहे. खा. डॉ. गिरीष बापट, खा.सदाशिव लोखंडे व खा. डॉ. सुजय विखे यांना निवेदनाच्या प्रती पाठविण्यात आल्या आहेत.
जिल्ह्यातील व्यापारी, उद्योजक व पर्यटक यांचा वेळ वाचण्यासाठी रात्रीच्या वेळी धावणारी साई एक्सप्रेस रेल्वे सुरु करण्याची मागणी करत प्रवासी संघटना व रेल्वे सल्लागार समितीच्या सदस्यांच्या वतीने गेली दहा वर्षे पाठपुरावा करीत होते. श्रीरामपूरहून 10 हजार नागरिकांच्या सह्यांचे निवेदन दररोज रेल्वे खात्याकडे पोस्टाने पाठवून महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघाचे अध्यक्ष व विभागीय रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य रणजित श्रीगोड यांनी रेल्वे अधिकार्‍यांचे लक्ष वेधले होते. अखेर सर्वांच्या प्रयत्नांना यश आले असून सोईस्कर अशा वेळ असलेली साई एक्सप्रेस येत्या 11 मार्च पासून सुरु होणार असल्याने अहमदनगर जिल्ह्यातील प्रवासी जनतेची मोठी सुविधा निर्माण होणार आहे. संजय जोशी यांनी रेल्वे खात्याचे आभार मानले आहेत.
साई एक्सप्रेस सुरु व्हावी यासाठी रणजीत श्रीगोड यांनी नुकत्याच झालेल्या विभागीय रेल्वे सल्लागार समितीचे सभेत या मागणीबाबत सविस्तर चर्चा केली. त्यावेळी विभागीय रेल्वे व्यवस्थापक शैलेश गुप्ता व वरिष्ठ मंडळ वाणिज्य व्यवस्थापक प्रदीप हिरडे यांनी 19 बोगी असलेली स्वतंत्र दर्जा असलेली साई एक्सप्रेस दौंड रेल्वे स्टेशनवरुन न जाता कॉर्ड लाईन मार्गे थेट पुण्याला जाण्याचा प्रस्ताव पाठविण्याचे जाहीर केले होते. मध्य रेल्वेचे प्रबंधक सुबोध जैन यांची रणजीत श्रीगोड यांचे समवेत एका शिष्टमंडळाने मुंबई येथे भेट घेऊन या मागणी बाबत लक्ष वेधले होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here