छत्रपती राजाराम महाराज म्हणजे प्रतिकूल परिस्थितीत संघर्षाची प्रेरणा : डॉ कोठारी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, February 26, 2021

छत्रपती राजाराम महाराज म्हणजे प्रतिकूल परिस्थितीत संघर्षाची प्रेरणा : डॉ कोठारी

 छत्रपती राजाराम महाराज म्हणजे प्रतिकूल परिस्थितीत संघर्षाची प्रेरणा : डॉ कोठारी

स्मायलिंग अस्मितेच्यावतीने 351 व्या जयंतीचे आयोजन


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः सध्या समाजात अनेक तरुण आत्महत्या करताना दिसत आहेत आई-वडिलांचा आणि स्वतःचा विचार न करता तरुण हे टोकाचे पाऊल उचलत आहे परंतु तरुणांनी छत्रपती राजाराम महाराजांचे चरित्र वाचले तर अशा गोष्टी घडणार नाहीत वडिलांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर भावाची निर्घृण हत्या झाल्यावर अचानक स्वराज्याची धुरा स्वतःच्या खांद्यावर पेलत सलग अकरा वर्ष मोगल बादशहाला शह देत संघर्ष करणारे छत्रपती राजाराम महाराज म्हणजे अद्वितीय महापुरुष होय असे मत स्मायलिंग अस्मिता कष्टकरी शेतकरी विद्यार्थी संघटनेच्या वतीने क्रांतीवीर छत्रपती चौथे शिवाजी महाराज स्मारक येथे आयोजित करण्यात आलेल्या छत्रपती राजाराम महाराज यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमात हिंद सेवा मंडळाचे उपकार्याध्यक्ष डॉ पारस कोठारी यांनी व्यक्त केले.दरम्यान न्यू आर्टस् महाविद्यालयाचे प्रा.डॉ. बाळासाहेब पवार यांनी छत्रपती राजाराम महाराज यांच्या जिंजी प्रवासादरम्यान अहमदनगर जिल्ह्यातील मांडवगण येथे मुक्कामीच्या घटनेचा उल्लेख करत छत्रपती राजाराम महाराज यांनी राजधानी महाराष्ट्रातून थेट जिंजीला नेऊन सरदारांना राखेल त्याला जहागीर असे धोरण अवलंबिले आणि पुन्हा एकदा नव्याने औरंगजेबाविरूध्द युद्ध पुकारले.कठोर परिस्थितीत राजकीय नेतृत्वाने कसं वागावं याच जागतिक स्तरावरील उदाहरण म्हणजे छत्रपती राजाराम महाराज. मराठ्यांना संपविण्यासाठी आलेला औरंगजेब स्वता संपुण गेला ते केवळ छत्रपती राजाराम महाराज यांच्या 11 वर्षांच्या धीरोदात्त प्रयत्नांमुळेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मायलिंग अस्मिता कष्टकरी शेतकरी विद्यार्थी संघटनेचे कार्याध्यक्ष यशवंत तोडमल यांनी केले तर आभार प्रदर्शन जैद शेख यांनी केले यावेळी बापू चंदनशिवे, श्रीपाद दगडे आणि ऑनलाइन पद्धतीने इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here