दरेवाडी संघाने पटकाविला नृसिंह चषक - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, February 26, 2021

दरेवाडी संघाने पटकाविला नृसिंह चषक

 दरेवाडी संघाने पटकाविला नृसिंह चषक

एकूण 70 संघांनी नोंदविला सहभाग


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः नगर तालुक्यातील भातोडी (पारगाव) येथे शिवजयंतीच्या मुहूर्तावर आयोजित करण्यात आलेल्या  राज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. प्रथम पारितोषिक नगर दरेवाडी संघाने तर द्वितीय संघर्ष क्रिकेट क्लब भातोडी व तृतीय सिंहगड ( मुंबई ) या संघाने पटकाविला आहे. उत्कृष्ट खेळाडू म्हणून प्रवीण लबडे यांची निवड करण्यात आली. तर शिस्तप्रिय संघ म्हणून दौलावडगाव संघाची निवड झाली.  
पारितोषिक वितरण पंचायत समितीचे सभापती प्रवीण कोकाटे यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रथम पारितोषिक- रू.31111, द्वितीय- रू.25555 व तृतीय रू.15555 असे अनुक्रमे तीन बक्षिसे ठेवण्यात आली होती.  राज्यातील एकूण 70 संघाने सहभाग नोंदवला.
पारितोषिक वितरण भाजपा तालुका अध्यक्ष तथा चिंचोडी पाटीलचे सरपंच मनोज कोकाटे, सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन विश्वनाथ कदम, सरपंच राहुल शिंदे, विजयकुमार बोरुडे, माजी सरपंच बबनराव घोलप, नृसिंह कृषी सेवा केंद्राचे प्रमुख तथा माजी कृषी अधिकारी रावसाहेब आघाव, राजेश परकाळे, युवा उद्योजक अशोक तरटे, उपसरपंच राजु पटेल, शिवसेना तालुका उपप्रमुख निसार शेख, शामराव घोलप, अल्ताफभाई पटेल, आशिर्वाद हॉटेलचे मालक सुनील थोरात, शंभूराजे हॉटेलचे मालक श्रीकांत काळे, शिक्षकनेते कैलास  दहातोंडे,  गणेश आठरे, सुनील थोरात, अविनाश झाम्बरे, दत्तात्रय जावळे, मनीष लोखंडे, मुंजाळ मॅडम, भाऊसाहेब धलपे, अशोक धलपे, सहदेव लबडे, विलास लबडे, अशोक कदम, बाळासाहेब पवार, पांडुरंग लबडे, रावसाहेब पवार आदी उपस्थित होते.  तसेच संयोजक टीमचे प्रतिनिधी प्रवीण लबडे, आदिनाथ शिंदे, दत्ता कदम, राजू काळे, सुधीर कदम, शिवाजी लबडे, साहिर पटेल, शरद घोरपडे यांसह आदी ग्रामस्थ उपस्थित होते .
तसेच  गावातील ग्रामपंचायतचे आजी-माजी सरपंच, उपसरपंच व सदस्य, तसेच सेवा सहकारी सोसायटीचे आजी-माजी अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक व गावातील सर्व तरूण मंडळाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment