मुंबई नंतर आता या राज्यात रेल्वे मधे सापडला स्फोटकांचा साठा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, February 26, 2021

मुंबई नंतर आता या राज्यात रेल्वे मधे सापडला स्फोटकांचा साठा

 मुंबई नंतर आता या राज्यात रेल्वे मधे सापडला स्फोटकांचा साठानगरी दवंडी

अहमदनगर - मुंबई नंतर आता केरळमध्ये प्रवासी रेल्वेमध्ये स्फोटकांचा साठा सापडला असून, यामुळे खळबळ उडाली आहे. कोझिकोड रेल्वे स्थानकावर ट्रेनमध्ये १०० हून अधिक जिलेटिनच्या कांड्या आणि ३५० डिटोनेटर सापडले असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

चेन्नई-मंगलपुरम एक्स्प्रेसमधून स्फोटकांचा हा साठा जप्त करण्यात आला आहे. एका महिलेकडून रेल्वे पोलिसांकडून हा साठा जप्त केला असून तिला ताब्यात घेण्यात आले आहे. रमानी असे ताब्यात घेण्यात आलेल्या महिलेचे नाव असून, रेल्वे पोलिसांनी तिला ताब्यात घेतलेले आहे.ही महिला मूळची तामिळनाडूची आहे. चौकशी केली असता आपण विहिर खोदण्यासाठी आपण ही स्फोटके नेत होते असा दावा तिने केला आहे.

परंतु रेल्वे पोलीस सध्या याप्रकरणी अधिक चौकशी करत आहेत.उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबई येथील घराजवळ पार्क केलेल्या एका कारमध्ये स्फोटके आढळून आल्याच्या घटनेस अवघे काही तास उलटत नाही, तोच प्रवासी रेल्वेत स्फोटके आढळून आल्याने सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here