शहर विकासाला गती द्यावी - महापौर वाकळे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, February 26, 2021

शहर विकासाला गती द्यावी - महापौर वाकळे

 शहर विकासाला गती द्यावी - महापौर वाकळे

आयुक्त शंकर गोरे यांनी घेतली महापौर यांची भेट


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः नुतन आयुक्त शंकर गोरे यांनी काल25 फेब्रुवारी 2021 रोजी महापौर बाबासाहेब वाकळे यांची भेट घेतली, शहर विकासावर चर्चा करुन विकास कामांना गती देण्याच्या सूचना महापौर यांनी यावेळी केल्या महापौर पुढे म्हणाले की, शासनाच्या विविध योजनांची कामे प्रलंबित आहेत या कामांना गती द्या तसेच शहरातील फेज 2 पाणी योजना, अमृत पाणी योजना व अंतर्गत भुयारी गटार योजनेची कामे जलद गतीने मार्गी लावावीत  करोना संदर्भातील विविध उपाययोजना कराव्यात, महापौर श्री बाबासाहेब वाकळे यांनी आयुक्त शंकर गोरे यांचे शहरवासियांच्या वतीने स्वागत करुन पुढील कामास शुभेच्छा दिल्या, यावेळी आयुक्त शंकर गोरे यांनी सांगीतले की, सहकार्याची भुमिका प्रत्येकाने द्यावी व संगणमताने कामे केल्यास विकास कामांना गती येते प्रशासकीय यंत्रणेकडून काम करुन घेण्याची जबाबदारी ही माझी आहे मी ती सक्षमपणे पार पाडीन अशी ग्वाही दिली. यावेळी उपायुक्त यशवंत डांगे, नगरसेवक डॉ. सागर बोरुडे, नगरसेवक अविनाश घुले, संजय ढोणे, अजय चितळे, मनोज ताठे, नगररचनाकार अजय चारठाणकर, राजेश लयचेट्टी, किशोर कानडे, पुष्कर कुलकर्णी आदी उपस्थीत होते.

No comments:

Post a Comment