नवनिर्वाचित बिशप ऑफ नाशिक म्हणून बिशप गायकवाड यांचा पदग्रहण सोहळा संपन्न - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, February 19, 2021

नवनिर्वाचित बिशप ऑफ नाशिक म्हणून बिशप गायकवाड यांचा पदग्रहण सोहळा संपन्न

 नवनिर्वाचित बिशप ऑफ नाशिक म्हणून बिशप गायकवाड यांचा पदग्रहण सोहळा संपन्न

नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः रा. रेव्ह शरदराव गायकवाड यांची नाशिक धर्मप्रांत, सी.एन.आय चे नवनिर्वाचित बिशप म्हणून प्रतिष्ठापणा व पदग्रहण सोळा नुकताच धार्मिक वातावरणात पार पडला.यावेळी प्रतिष्ठापणा सोहळ्या निमित्त बिशप एम.यु.कसाब यांचे उपदेश झाला . गायकवाड यांचा पदग्रहण सोहळा हा सेंट सेव्हिअर्स कॅथेड्रल, तारकपुर येथे धार्मिक व आनंदाच्या वातावरणात संपन्न झाला.यावेळी बिशप कसाब म्हणाले की, सि.एन.आय ला प्रभू येशूचा वारसा आहे. प्रभूने ख्रिस्त मंडळीची पहिली जबाबदारी संत पेत्र यांचेवर सोपविली होती हा वारसा पुढे चालवत जाऊन ख्रिस्त मंडळ्यांची जबाबदारी नाशिक धर्मप्रांताचे आठवे बिशप म्हणून रा.रेव्ह. शरदराव गायकवाड यांचेवर सोपविलेली आहे.
बिशप शरद गायकवाड यांनी बोलताना सांगितले की, परमेश्वराने जी जबाबदारी माझ्यावर सोपविलेली आहे ती जबाबदारी प्रामाणिपणे पुर्ण करण्याचा मी प्रयत्न करीन.बिशप गायकवाड यांनी याआधी पुणे , नागपूर येथे ही बिशप पदावर काम पाहिले आहे.या कार्यक्रमास नाशिक धर्मप्रांतातील सर्व चर्चेसचे धर्मगुरु, तसेच मंडळातील सभासद, धर्मप्रांताचे पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य तसेच विविध चर्चेचे पदाधिकारी व शैक्षणिक संस्थांचे प्रमुख व स्टाफ हे मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
यावेळी गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास सेंट सेव्हिअर्स कॅथेड्रलचे पिस्ट इन चार्ज रेव्ह डि.डि.सोनवणे यांनी सर्व धार्मिक विधिचे नियोजन केले. तसेच चर्चचे सचिव प्रशांत पगारे व खजिनदार श्रीमती मायाताई जाधव यांनी व पास्टोरेट कमिटीचे सदरील कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अथक प्रयत्न केले.

No comments:

Post a Comment