शिवाजी महाराजांचे शिवचरित्र जगातील प्रत्येकाला मार्गदर्शक ः प्रा. मोडक - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, February 19, 2021

शिवाजी महाराजांचे शिवचरित्र जगातील प्रत्येकाला मार्गदर्शक ः प्रा. मोडक

 शिवाजी महाराजांचे शिवचरित्र जगातील प्रत्येकाला मार्गदर्शक ः प्रा. मोडक


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः छत्रपती शिवाजी महाराजांनी केवळ 50 वर्षात जे अत्युच्च कार्य केले त्यास तोड नाही. शिवाजी महाराजांचे शिवचरित्र आज जगातील प्रत्तेकाला मार्गदर्शक आहे, अशा शब्दात हिंदसेवा मंडळाचे अध्यक्ष प्रा.शिरीष मोडक यांनी शिवजयंती निमित्त अभिवादन केले.
पेमराज सारडा महाविद्यालयातील विद्यार्थी व माजी विद्यार्थ्यांच्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त शिवाजी महाराजांच्या पुतळ्या भवती भगव्या फुग्यांची व रांगोळीची आकर्षक सजावट करण्यात आली होती. हिंदसेवा मंडळाचे अध्यक्ष प्रा.शिरीष मोडक, कार्याध्यक्ष अजित बोरा, उपकर्याध्यक्ष डॉ.पारस कोठारी, संचालक प्रा.मकरंद खेर, मधुसूदन सारडा आदींनी शिवाजी महाताजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपप्राचार्य डॉ.मिलिंद देशपांडे, डॉ.मंगला भोसले, पर्यवेक्षक डॉ.सुजित कुमावत, प्रबंधक अशोक असेरी, प्रा.संजय धोपावकर आदींसह प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.
अजित बोरा म्हणाले, पेमराज सारडा महाविद्यालयात सर्व प्राध्याप व वियार्थी सर्व सण उत्सव मोठ्या आनंदात साजरे करत असल्याणे उत्साहाचे व प्रफुल्लीत वातावरण महाविद्यालयात होत असते.डॉ.पारस कोठारी म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचे अथांग कार्य थोडक्यात बोलणे अवघड आहे. स्वराज्या चालवण्याची त्यांची कार्यपद्धत आजही एमबीए व इंजानिरिंग क्षेत्राल लाजवणारी आहे.
प्रा.मकरंद खेर म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले नसते तर आज आपण नसतो. त्यामुळे शिवाजी महाराज आपल्या साठी देवा समान आहेत.कार्यक्रमाचे प्रास्ताविक इतिहास विभाग प्रमुख प्रा. सुरेखा गांगार्डे यांनी केले. सुत्रसंचलन प्रा. कृष्णा पाटील यांनी केले. कार्याक्रमचे आयोजन अक्षय गव्हाणे, सिद्धार्थ गायकवाड, आनंद चौरे, किशोर डमाळे, निस्सार शेख, रामा मनोहर आदींनी केले.

No comments:

Post a Comment