नेवासामधील मोहनीराज यात्रा बंद पाडण्याचा प्रयत्न केल्यास अद्दल घडवू - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, February 8, 2021

नेवासामधील मोहनीराज यात्रा बंद पाडण्याचा प्रयत्न केल्यास अद्दल घडवू

 नेवासामधील मोहनीराज यात्रा बंद पाडण्याचा प्रयत्न केल्यास अद्दल घडवू

अंबादास लष्करे याचा सज्जड इशारा


नगरी दवंडी/प्रतिनिधी
नेवासा ः सालाबादप्रमाणे यंदा फेब्रुवारी महिन्यात नेवासा येथील मोहिनीराजची यात्रा सुरू होणार आहे.   नेवासा शहरातील ग्रामदैवत  मोहिनीराजाचे फार मोठे महत्त्व नेवासा तालुक्यात आहे . यंदा मात्र करुणा या आजाराच्या पार्श्वभूमीवर  सर्व काही सुरळीत   सुरू झाले असताना काही विघ्नसंतोषी  व्यक्ती नेवाशातील यात्रा होऊ नये यासाठी प्रयत्नशील आहेत अशा व्यक्तींना शिवसेनेचे तालुका शहर संघटक अंबादास लष्करे यांनी सज्जड इशारा दिला आहे .यावेळी त्यांनी सांगितले की ,यंदाची यात्रा ही निश्चित भरवण्यात येईल आणि भाविकांनी  सर्व सामाजिक नियमांचं पालन करून यात्रेमध्ये सहभाग घ्यायचा आहे .आणि यात्रेला कुठल्याही प्रकारचं गालबोट न लागता सुरळीतपणे महोत्सव पार पाडायचा आहे .यात्रा कमिटीबरोबर चर्चा करून त्याबाबत सर्व काही निर्णय घेण्यात येतील असेही त्यांनी यावेळी नमूद केले .
यावेळी शिवसेनेचे तालुका उपप्रमुख मुन्नाभाई चक्रनारायण , शिवसैनिक नारायण लष्करे,  अण्णा  इरले ,शहरप्रमुख नितीन जगताप,  हिरामण धोत्रे ,गणेश झगरे   आणि तालुक्यातील सर्व शिवसैनिक आणि पदाधिकारी उपस्थित होते.  

No comments:

Post a Comment