चर्मकार विकास संघाच्या युवा प्रदेश कार्याध्यक्षपदी अमोल बोर्‍हाडे यांची नियुक्ती - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, February 22, 2021

चर्मकार विकास संघाच्या युवा प्रदेश कार्याध्यक्षपदी अमोल बोर्‍हाडे यांची नियुक्ती

 चर्मकार विकास संघाच्या युवा प्रदेश कार्याध्यक्षपदी अमोल बोर्‍हाडे यांची नियुक्ती

नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः चर्मकार विकास संघाच्या युवा प्रदेश कार्याध्यक्षपदी युवा उद्योजक अमोल बोर्‍हाडे यांची नियुक्ती करण्यात आली. चर्मकार विकास संघाचे प्रदेशाध्यक्ष संजय खामकर यांनी शहरातील संपर्क कार्यालयात त्यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांचा सत्कार केला. यावेळी जेष्ठ नेते रामदास सोनवणे, प्रदेश सचिव प्रा. सुभाष चिंधे, कारभारी देव्हारे, गोरक्षनाथ कांबळे, राजेंद्र कांबळे, रघुनाथदादा वाकचौरे, अरुण मोढे, रंजना मोढे, कबीर मोढे आदी उपस्थित होते.
अमोल बोर्‍हाडे यांचे सामाजिक क्षेत्रातील योगदान व युवकांमध्ये असलेले संघटन कौशल्य पाहून त्यांची चर्मकार विकास संघाच्या युवा प्रदेश कार्याध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. संगमनेरमध्ये कार्यरत राहून त्यांनी अनेक युवक-युवतींना रोजगार उपलब्ध करुन देण्याचे कार्य केले. तर विविध सामाजिक कार्यात त्यांचा नेहमीच पुढाकार असतो. संघटनेच्या माध्यमातून समाजातील प्रश्न सोडविण्यासाठी ते प्रयत्नशील राहणार असल्याची भावना प्रदेशाध्यक्ष संजय खामकर यांनी व्यक्त केली. उपस्थितांनी बोर्हाडे यांना पुढील कार्यास शुभेच्छा व्यक्त केल्या. या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

No comments:

Post a Comment