सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लाभ व निवृत्तीवेतन प्रस्तावास मंजूरी देण्याची मागणी - संतोष कानडे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, February 22, 2021

सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लाभ व निवृत्तीवेतन प्रस्तावास मंजूरी देण्याची मागणी - संतोष कानडे

 सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लाभ व निवृत्तीवेतन प्रस्तावास मंजूरी देण्याची मागणी - संतोष कानडे


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लाभ व निवृत्तीवेतन प्रस्तावास मंजूरी देण्याच्या मागणीचे निवेदन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री ना. उदय सामंत यांना देण्यात आल्याची माहिती कर्मचारी महासंघाचे जिल्हा सचिव संतोष कानडे यांनी दिली.
उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालय पुणे या उपक्रमांतर्गत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री ना. सामंत यांनी संस्था प्रतिनिधी, प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी यांच्याशी पुणे विद्यापीठात संवाद साधला. यावेळी कानडे यांनी सदर प्रश्नाचे निवेदन दिले. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ.धनराज माने, कुलगुरू डॉ.नितिन करमळकर, कुलसचिव डॉ.प्रफ्फुलपवार, पुणे विभागीय सहसंचालक डॉ. मोहन खताळ, प्रशासन अधिकारी अर्चना बोर्हाडे आदींसह संबंधित अधिकारी उपस्थित होते. सेवानिवृत्ती वेतन प्रस्तावाला त्वरित मंजुरी मिळावी, आश्वासितप्रगती योजना पुर्वलक्षी प्रभावाने लागू करुन सातवा वेतन आयोगाचा लाभ मिळावा, मेडिकल बीलाना मंजुरी, कॅशलेस मेडिकल सुविधा, अनुकंपा भरती, शिक्षकेतर पदभरती सुरू करावी, वेतन त्रुटी प्रस्ताव त्वरित मंजुर करणे आदी विविध मागण्या पुर्ण करण्याचे निवेदनात म्हंटले आहे. याप्रसंगी विविध महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment