काँग्रेस बळकटीकरण सप्ताहामुळे शहरात काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जितावस्था- किरण काळे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, February 10, 2021

काँग्रेस बळकटीकरण सप्ताहामुळे शहरात काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जितावस्था- किरण काळे

 काँग्रेस बळकटीकरण सप्ताहामुळे शहरात काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जितावस्था- किरण काळे

महसूल मंत्री ना.बाळासाहेब थोरात यांचा वाढदिवस उत्साहात संपन्न


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त नगर शहरामध्ये पक्षाच्यावतीने काँग्रेस बळकटीकरण सप्ताह राबविण्यात आला. सात दिवस शहराच्या विविध प्रभागांमध्ये प्रत्यक्ष लोकांमध्ये जात हा सप्ताह साजरा केला गेला. यातून शहरातील काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांना मोठी ऊर्जा मिळाल्याचे प्रतिपादन शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केले आहे.
ना. थोरात यांचा वाढदिवस काँग्रेस कमिटीमध्ये विशेष कार्यकर्ता संमेलन आयोजित करून तसेच कार्यकर्त्यांनी एकमेकांना केक भरवत संपन्न झाला. यावेळी काळे बोलत होते. यावेळी माजी महापौर दीप चव्हाण, शहर ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष मनोज गुंदेचा, फारुक शेख यांच्यासह शहर जिल्हा काँग्रेसचे पदाधिकारी, विविध फ्रंटल, विभागांचे प्रमुख, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.काळे यावेळी म्हणाले की, ना.थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक वर्षानंतर नगर शहरामध्ये काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मरगळ झटकत शहरातील वेगवेगळ्या प्रभागांमध्ये प्रत्यक्ष लोकांमध्ये जाऊन पक्ष बळकटीकरणासाठी कार्यक्रमांचे आयोजन केले.
या कार्यक्रमाला नगरकरांनी गर्दी केली.सप्ताह दरम्यान नागरिकांनी अनेक प्रश्न आपल्यासमोर मांडले आहेत. नगरकरांशी काँग्रेस पक्षाचा हा संवाद अधिक वाढविण्यासाठी आगामी काळामध्ये विविध उपक्रम शहरात हाती घेतले जातील. ना.बाळासाहेब थोरात, आ.डॉ.सुधीर तांबे, युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सत्यजितदादा तांबे यांच्या माध्यमातून नगरच्या भरीव विकासासाठी काँग्रेस आक्रमकपणे काम करेल, असे यावेळी काळे म्हणाले. यावेळी ब्लॉक अध्यक्ष मनोज गुंदेचा म्हणाले की, पक्षनेतृत्वाने किरण काळे यांच्या रूपाने शहरात काँग्रेसला भक्कम आणि सुसंस्कृत नेतृत्व दिले आहे. माजी मंत्री असिर सर यांच्या नंतर नगर शहरामध्ये काँग्रेसला नेतृत्व करण्याची संधी मिळाली नाही. काळे यांच्या विकासाचे व्हिजन असणार्‍या दूरदृष्टीच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष पुन्हा एकदा त्यासाठी सक्षम होईल, असा विश्वास गुंदेचा यांनी यावेळी व्यक्त केला. संमेलनामध्ये शहर जिल्हा उपाध्यक्ष खलील सय्यद यांनी ना. बाळासाहेब थोरात यांनी आपल्या प्रदेशाध्यक्षपदाचा कालावधीमध्ये बाजीप्रभू यांची भूमिका वठवत राज्यात पक्ष वाढीसाठी केलेल्या भरीव कामाबद्दल अभिनंदनाचा ठराव मांडला. त्याला मनोज गुंदेचा यांनी अनुमोदन दिले. शहर जिल्हा सरचिटणीस नलिनी गायकवाड यांनी आ. नाना पटोले यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव मांडला. त्याला फारुख शेख यांनी अनुमोदन दिले.

No comments:

Post a Comment