शरद पवारांचे सर्व कार्यक्रम 1 मार्चपर्यंत स्थगित - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, February 22, 2021

शरद पवारांचे सर्व कार्यक्रम 1 मार्चपर्यंत स्थगित

 शरद पवारांचे सर्व कार्यक्रम 1 मार्चपर्यंत स्थगित


मुंबई :
राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल जनतेला संबोधित करताना काही निर्बंध जारी केले आहेत. राज्यातले सर्व राजकीय, सामाजिक व सरकारी कार्यक्रम 28 मार्चपर्यंत रद्द करण्याची घोषणा त्यांनी केली आहे. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही एक मार्च पर्यंत आपले सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत.
राजकीय, धार्मिक आणि सामजिक कार्यांना राज्यात काही दिवस बंदी असणार आहे. यात मिरवणुका, मोर्चे, आंदोलन, यात्रा आदींचा समावेश असणार आहे. तसेच, लॉकडाउन करायचा का? या प्रश्नाचे उत्तर येत्या आठ दिवसांत जनतेकडूनच घेणार आहे.ज्यांना लॉकडाउन हवे असेल ते विना मास्कचे फिरतील आणि ज्यांना लॉकडाउन नको आहेत, ते मास्क घालून सर्व नियमांचे पालन करतील, असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाउनसाठी जनतेलाच आठ दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here