रुईछत्तीसी जनता विद्यालयातील शिक्षकास मारहाण - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, February 24, 2021

रुईछत्तीसी जनता विद्यालयातील शिक्षकास मारहाण

 रुईछत्तीसी जनता विद्यालयातील शिक्षकास मारहाण

शिक्षक संघटनांच्यावतीने आरोपीस अटक करुन कारवाई करण्याची मागणी


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः रुईछत्तीसी (ता. नगर) येथील जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षकांना झालेल्या मारहाणीचा निषेध नोंदवून, शिक्षकांना मारहाण करणार्या आरोपींना तात्काळ अटक करुन कठोर कारवाई करण्याची मागणी अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघटना, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद व इतर शिक्षक संघटनांच्या वतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन नगर तालुका पोलीस स्टेशन येथे सहा. पो.नि. राजेंद्र सानप यांना देण्यात आले. मंगळवार दि.23 फेब्रुवारी रोजी सकाळी रुईछत्तीसी येथील जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक डी.जी. महारनवर व कोरके यांना गावातील विकास खाकाळ यांनी मारहाण करुन धमकी दिल्याचा प्रकार घडला असल्याचे तक्रारीत म्हंटले आहे. दुपारी शिक्षक संघटनेचे पदाधिकारी व शिक्षकांनी नगर तालुका पोलीस स्टेशन येथे एकत्र येऊन या घटनेचा निषेध नोंदविला. तर शिक्षकांना मारहाण करणार्या आरोपींना तात्काळ अटक करुन कठोर कारवाई करण्याची मागणी केली. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिक्षक संघटनांच्या वतीने देण्यात आला आहे.
यावेळी माध्यमिक शिक्षक संघाचे सचिव आप्पासाहेब शिंदे, शिक्षक परिषदेचे नेते बाबासाहेब बोडखे, जुनी पेन्शन योजना कोअर कमिटीचे राज्य सचिव महेंद्र हिंगे, दत्तापाटील नारळे, शिरीष टेकाडे, संजय कोतकर, प्राचार्य पी.एस. गोरे, सुनिल म्हस्के, बद्रीनाथ शिंदे, आशिष आचारी, दिनकर मुळे, भाऊसाहेब जिवडे आदींसह शिक्षक व शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

No comments:

Post a Comment