मिरी येथील ग्रामपंचायत कार्यालयात गाडगेबाबांना अभिवादन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, February 24, 2021

मिरी येथील ग्रामपंचायत कार्यालयात गाडगेबाबांना अभिवादन

 मिरी येथील ग्रामपंचायत कार्यालयात गाडगेबाबांना अभिवादन


नगरी दवंडी/प्रतिनिधी
मिरी  ः पाथर्डी तालुक्यातील मिरी येथील ग्रामपंचायत कार्यालयात स्वच्छतेचे जनक असलेले संत गाडगेबाबा यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. मंगळवारी सकाळी जयंतीनिमित्त मान्यवरांच्या हस्ते संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले.यावेळी पाथर्डी पंचायत समिती सदस्य राहुल गवळी,सरपंच आदिनाथ सोलाट यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य संजय शिंदे,जालिंदर गवळी,ग्रामविकास अधिकारी राजेंद्र साखरे व परशुराम गायकवाड आदींसह ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.


No comments:

Post a Comment