कोण होईल ‘गावकारभारी’? - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, February 3, 2021

कोण होईल ‘गावकारभारी’?

 कोण होईल ‘गावकारभारी’?

पळवापळवी.. घोडे बाजाराला येणार वेग...

सरपंच - उपसरपंचाची 9 व 10 जाने. निवड


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः ग्रामपंचायत निवडणुका होऊन सरपंचपदाचे आरक्षण जाहीर झाले आहे. मात्र, सर्वांना प्रतीक्षा लागून होती ती सरपंच पदाच्या निवडीच्या तारखेची ! आता ही प्रतिक्षा संपली असून येत्या 9 व 10 फेब्रुवारीला सरपंच व उपसरपंचपदाची निवड होणार आहे. तसा कार्यक्रम जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी जाहीर केला आहे. आरक्षण जाहीर झाल्यापासूनच सदस्यांची पळवापळवी सुरू होती, आता या पळवापळवीला आणखीच वेग येणार असून काही ठिकाणी घोडेबाजार होण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.

जिल्हाधिकारी यांनी सरपंच, उपसरपंच निवडीसाठी कार्यक्रम यांनी जाहीर केला आहे. त्यासंदर्भात संबंधित ग्रामपंचायतीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत हे अधिकारी संबंधित ग्रामपंचायत मध्ये 9 व 10 रोजी निवडणुकीचा कार्यक्रम पार पाडणार आहेत.कोरोनाच्या संसर्गामुळे मुदत संपूनही ग्रामपंचायतींच्या निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या.सरपंचपदाचे आरक्षण जाहीर झाले नसल्याने सगळ्याच प्रवर्गातील उमेदवारांनी आपल्या जागेसाठी जोर लावला होता.या निवडणुकांमध्ये तरुणाई मोठ्या प्रमाणात उतरल्याने निवडणुकीत रंग भरला होता. या निवडणुकीत अनेक मातब्बरांना धक्का बसला तर अनेक ठिकाणी सत्तांतरही घडले.ग्रामपंचायत निवडणुकीनंतर सरपंचपदाच्या आरक्षणाकडे सर्वांचेच लक्ष लागून होते. अखेर 27 जानेवारीला आरक्षणाची सोडत निघाली.यात काहींना लॉटरी लागली तर काहींच्या अपेक्षेवर पाणी पडले. आरक्षण जाहीर होतात सरपंचपदासाठी इच्छुक असणार्‍यांनी फिल्डींग लावण्यास सुरुवात केली आहे. आता सरपंचपदाच्या निवडणुकीची तारीख जाहीर झाल्याने पळवा पळवीस आणखी वेग येणार असून काही ठिकाणी घोडेबाजार होण्याची शक्यता आहे.

No comments:

Post a Comment