महिलांसाठी अत्याधुनिक फिरता दवाखाना ः राजेश टोपे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, February 3, 2021

महिलांसाठी अत्याधुनिक फिरता दवाखाना ः राजेश टोपे

 महिलांसाठी अत्याधुनिक फिरता दवाखाना ः राजेश टोपे


मुंबई ः
नॅशनल हेल्थ मिशनच्या माध्यमातून लवकरच मुंबईसह राज्याच्या ग्रामीण भागातील महिलांसाठी अत्याधुनिक व अद्ययावत फिरता दवाखाना सुरू करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
महिलांना घरातून हॉस्पिटलमध्ये आणणे. विशेषतः गरोदर महिला आहेत त्यांना त्यांच्या घरी सुरक्षित सोडणे यासाठी ही सुविधा असणार आहे. या फिरत्या दवाखान्यात टेस्टींग, लॅब, 81 प्रकारची औषधे, 40 प्रकारच्या टेस्ट, सोनोग्राफी व महिलांचे बाळंतपण केले जाऊ शकते. ग्रामीण भागात प्रत्येक जिल्हयाला दोन - दोन फिरते दवाखाने असणार आहे. ग्रामीण भागासह मुंबईमध्ये अधिक वाढ केली जाणार असून याचा चांगला परिणाम होईल असेही राजेश टोपे यांनी सांगितले.दरम्यान याचे मुख्यमंत्र्यांच्या किंवा रश्मीताई ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येईल अशी माहितीही राजेश टोपे यांनी दिली.

No comments:

Post a Comment