मारहाण, दमदाटी करुन वाहने पेटवून दिली, गुन्हा दाखल. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, February 3, 2021

मारहाण, दमदाटी करुन वाहने पेटवून दिली, गुन्हा दाखल.

 मारहाण, दमदाटी करुन वाहने पेटवून दिली, गुन्हा दाखल.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः अंकुश मधुकर जाधव वय 31 वर्ष रा. रेणाविकर कॉलनी, घर नं 25, निर्मल नगर यांना शिवीगाळ, दमदाटी, मारहाण करून त्यांचे घरासमोरील टेम्पो, स्कुटी, सुझुकी मोटर सायकलला आग लावून नुकसान करणार्‍या महेश उर्फ मारी वाल्हेकर रा. गजराजनगर याच्यावर तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पूर्ववैमनस्यातून हा प्रकार घडल्याचा पोलिसांना संशय आहे.

सदर घटनेची हकीकत अशी की, फिर्यादी अंकुश जाधव व आरोपी महेश वाल्हेकर या दोघांमध्ये दि. 2 जाने. रोजी रात्री 11:45 चे दरम्यान नगर औरंगाबाद रोड वरील रिलायन्स पेट्रोल पंपावर पेट्रोल भरीत असताना वाद झाला.
 यावेळी फिर्यादीस शिवीगाळ करून आरोपीने तुझ्याकडे पाहून घेतो असा दम दिला होता. दि. 3 जाने. रोजी पहाटे 3:30 च्या दरम्यान फिर्यादीच्या घरासमोरील टेम्पो (चक 17 इू 2037), स्कुटी मोटरसायकल (चक 24 च.5154), सुझुकी मोटरसायकल (चक-16-घ 2997), या वाहनांना अज्ञात इसमाकडून आग लावण्यात आली. ही आग आरोपीने लावली असल्याचा फिर्यादीचा संशय आहे. फिर्यादीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एस.पी. गायकवाड,पोसई सुरज मेढे यांनी घटनास्थळी भेट देऊन परीस्थितीचा आढावा घेतला असुन पुढील तपास पोकॉ.एस.डी. मोरे करीत आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here