13 फेब्रुवारी रोजी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया, नेत्र, दंत व आरोग्य तपासणी, औषधे वाटप शिबीर - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, February 10, 2021

13 फेब्रुवारी रोजी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया, नेत्र, दंत व आरोग्य तपासणी, औषधे वाटप शिबीर

 13 फेब्रुवारी रोजी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया, नेत्र, दंत व आरोग्य तपासणी, औषधे वाटप शिबीर

नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः एकदंत गणेश मंदिराच्यावतीने  शनिवार दि. 13 फेब्रुवारी 2021 रोजी स. 10 ते दु.2 या वेळेत दातरंगे मळा, एकदंत कॉलनी, अ.नगर  येथे मोफत नेत्र,दंत व आरोग्य तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया व औषधे वाटप  शिबीराचे आयोजन करण्यात आले.आज संगणक, टीव्ही व प्रदुषणमुळे डोळ्यांवर  व आरोग्यावर दुष्परिणाम होऊ लागले आहेत. काही शहरी व ग्रामीण भागात डोळ्यांची व आरोग्याची निगा राखण्यामध्ये जनतेचे दुर्लक्ष होत चालले आहे. त्यातच मोतीबिंदू सारख्या सुमारे 10 ते 12 हजार रुपयांच्या शस्त्रक्रिया सामान्यांच्या आवाक्याबाहेरच्या असतात. म्हणून आम्ही हे शिबीर आयोजित केले आहे.आनंदऋषीजी नेत्रालय यांच्या सहकार्याने हे शिबीर होणार आहे. नेत्रतपासणीपासून ते मोतीबिंदू पर्यंतचे सर्व सोपास्कार मोफत करण्यात येणार आहेत. यामध्ये रुग्णांचा भोजन, निवास व काळा चष्मा आदि बाबींचा समावेश आहे. शस्त्रक्रियेसाठी निवडण्यात आलेल्या रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. तसेच मोफत आरोग्य तपासणी व औषध वाटप शिबीरात रुग्णांची तपासणी तज्ञ डॉक्टर्स करणार आहेत. नागरीकांना व रुग्णांना योग्य ते मार्गदर्शन करुन औषधे वाटप करणार आहेत.  रुग्णांनी  शिधा पत्रिका झेरॉक्स सोबत आणावी, सध्या चालू असलेले औषध व गोळ्याही बरोबर आणाव्यात.रुग्णांसाठी नावनोंदणी आवश्यक असून जालिंदर बोरुडे मो.9881810333, भिमराज कोडम मो.7798883907 अमर बुरा मो. 8888843690, श्रीनिवास बुरगुल  मो.9518913080, विकास मारपेल्ली मो.8087321706, स्वप्नील सग्गम मो.9156561172 यांच्याशी संपर्क साधावा. तरी रुग्णांनी या मोफत तपासणी शिबीराचा व शस्त्रक्रियेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी  केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here