आयडियल स्टडी अ‍ॅपमुळे सुलभ अभ्यासाचा पर्याय खुला ः अ‍ॅड.फडणीस - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, February 24, 2021

आयडियल स्टडी अ‍ॅपमुळे सुलभ अभ्यासाचा पर्याय खुला ः अ‍ॅड.फडणीस

 आयडियल स्टडी अ‍ॅपमुळे सुलभ अभ्यासाचा पर्याय खुला ः अ‍ॅड.फडणीस

भाईसथ्था प्रशालेत विद्यार्थ्यांसाठी आयडियल स्टडी अ‍ॅपचे मोफत वितरण  


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः  भाईसथ्था रात्र प्रशालेतील विद्यार्थी दिवसा कष्ट करून रात्रीच्या शाळेत मेहनतीने व परिश्रमाने शिक्षण घेत आहेत.कोरोनामुळे दहावीच्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी कमी वेळ मिळाला आहे. आयडियल स्टडी ऍप्प मुळे विद्यार्थ्यांना कमी वेळेत जास्त सराव करून प्रश्नपत्रिका सोडवता येतील.हिंद सेवा मंडळाने विद्यार्थ्यांसाठी आयडियल स्टडी ऍप्प चे मोफत वितरण करून सुलभ अभ्यासासाठी पर्याय खुला केला आहे.शाळेचे चेअरमन,प्राचार्य व हिंद सेवा मंडळाच्या सर्व संचालक मंडळाच्या प्रयत्नामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा प्राप्त होत आहेत.याचा लाभ घेऊन विद्यार्थ्यांनी शैक्षणिक प्रगती करावी.असे प्रतिपादन पेमराज सारडा महाविद्यालयाचे जुनिअर कॉलेजचे चेअरमन अँड अनंत फडणीस यांनी केले.
 हिंदसेवा मंडळाच्या भाईसथ्था नाईट हायस्कूलचा दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आयडियल स्टडी ऍप्प चे मोफत वितरण करण्यात आले.याप्रसंगी पेमराज सारडा महाविद्यालयाचे जुनिअर कॉलेजचे चेअरमन अँड अनंत फडणीस बोलत होते.यावेळी हिंदसेवा मंडळाचे कार्याध्यक्ष अजित बोरा,भाईसथ्था नाईट हायस्कूलचे चेअरमन डॉ.पारस कोठारी,शालेय समिती सदस्य विलास बडवे,प्राचार्य सुनील सुसरे आदींसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.अजित बोरा म्हणाले कि,विद्यार्थ्यांनी दुकानात काम करताना मिळालेल्या फावल्या वेळेत आयडियल स्टडी ऍप्प द्वारे सर्व विषयांचा अभ्यास करावा.हिंद सेवा मंडळ व रोटरी क्लबच्या सहकार्याने हा ऍप्प मोफत प्राप्त झाला आहे.या संधीचा लाभ घेऊन विद्यार्थ्यांनी यश मिळवावे.हा ऍप्प दहावीच्या विद्यर्थ्यांसाठी अत्यन्त उपयुक्त असा आहे.                        प्रास्तविकात डॉ.पारस कोठारी म्हणाले कि,दहावीच्या विद्यार्थ्यांना नेहमीच हिंद सेवा मंडळ व मासूम संस्थेमार्फत  शैक्षणिक सुविधा देऊन प्रोत्साहन देण्यात येते.आयडियल स्टडी ऍप्प द्वारे सर्व विषयांची पाठय पुस्तके,प्रत्येक पाठाचे महत्वाचे मुद्दे,सूत्रे ,सनावळी व प्रश्नोत्तरे,सर्वासाठी कृतिपत्रिका,भाषा विषयांसाठी खास मूळ व्याकरण व उपयोजित लेखनासहित मार्गदर्शन इत्यादी सुविधा उपलब्ध असल्याने मोबाईल वर सहज विना पुस्तक अभ्यास करता येईल. सूत्र संचालन प्रा.शरद पवार यांनी केले तर आभार अमोल कदम यांनी मानले.

No comments:

Post a Comment