स्टेट बँकेच्या कामकाजात सुधारणा न झाल्यास आंदोलन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, February 24, 2021

स्टेट बँकेच्या कामकाजात सुधारणा न झाल्यास आंदोलन

 स्टेट बँकेच्या कामकाजात सुधारणा न झाल्यास आंदोलन

शहराध्यक्ष वसिम राजे यांचा मनसे स्टाईल इशारा


नगरी दवंडी/प्रतिनिधी
पारनेर ः स्टेट बँकेच्या कामकाजात सुधारणा न झाल्यास मनसेच्या पध्दतीने 1 मार्च रोजी आंदोलन करण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष वसिम राजे यांनी शाखा व्यवस्थापक श्रीराज शेवाळे यांच्याशी चर्चा करताना दिला.यासंदर्भात शेवाळे यांना निवेदन देण्यात आले आहे.संतोष सोबले,निखील बोरकर,अक्षय सूर्यवंशी, अविनाश औटी,गोकूळ थोरात, रियाज राजे आदी उपस्थित होते.
स्टेट बँकेच्या कर्मचार्‍यांकडून,रोखापालांकडून अल्पशिक्षित, वृध्द,निवृत्ती वेतन धारकांना अपमानास्पद वागणूक दिली जाते,काम टाळण्यासाठी बँकेऐवजी ग्राहक सेवा केंद्रात व्यवहार करण्याची सक्ती करण्यात येते.खाते सुरू करण्याची बँकेत निःशुल्क केली जात असताना  ग्राहक सेवा केंद्रात 100 रुपये आकारण्यात येतात.कर्मचार्‍यांच्या काम टाळण्याच्या प्रवृत्तीमुळे ग्राहकांना निष्कारण भुर्दंड सहन करावा लागतो.बँकेच्या एटीएममध्ये अनेक रक्कम शिल्लक नसते.एटीएमसह कॅश डिपॉझीट मशीन वारंवार बंद पडते.सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत अशी सलग व्यवहाराची वेळ असताना दुपारी एक तास व्यवहार बंद ठेवण्यात येतात.तशी सूचना बँकेच्या आवारात लावलेली नसल्याने ग्राहकांना ताटकळत बसावे लागते.कर्मचार्‍यांच्या मनमानीमुळे ग्राहकांना मनस्ताप भोगावा लागतो.अश्या विविध तक्रारी वसिम राजे यांनी शाखा व्यवस्थापक श्रीराज शेवाळे यांना दिलेल्या निवेदनात केल्या आहेत.
येत्या आठ दिवसांत कर्मचार्‍यांच्या वागणुकीत व बँकेच्या कामकाजात सुधारणा न झाल्यास मनसेच्या पध्दतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा शहराध्यक्ष वसिम राजे यांनी शाखा व्यवस्थापक श्रीराज शेवाळे यांच्याशी चर्चा करताना दिला आहे.

ग्राहक सेवा केंद्रात व्यवहार करण्याची सक्ती नाही
        ग्राहकसेवा केंद्रात व्यवहार करण्याची अथवा खाते सुरू करण्याची सक्ती करण्यात येणार नाही.कर्मचार्‍यांच्या जेवणासाठी व्यवहार बंद राहणार नाहीत याची काळजी घेण्यात येईल.संपूर्ण तालुक्यात स्टेट बँकेच्या पारनेर शाखेच्या एटीएमचा सर्वात जास्त वापर होतो.तांत्रीक बिघाडामुळे अपवादात्मक परिस्थितीत एटीएम बंद पडू शकते.एटीएम व कॅश डिपॉझीट मशीनचा ग्राहकांनी योग्य रितीने वापर केला तर बिघाडाचे प्रमाण आणखी कमी होईल.सलग सुट्या असल्यावर एटीएममध्ये  रक्कम शिल्लक रहात नाही. ग्राहकांशी सौजन्याने वागण्याच्या सूचना कर्मचार्‍यांना देण्यात आल्या आहेत.
श्रीराज शेवाळे, शाखा व्यवस्थापक


No comments:

Post a Comment